
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रांमधील पीएच.डी प्रवेशाची पुढील फेरी लवकरच सुरू होणार आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाने संबंधित मार्गदर्शकांकडील रिक्त जागांची माहिती मागविली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.