esakal | खूशखबर! सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी Phd अनिवार्य नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

New teacher

खूशखबर! सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी Phd अनिवार्य नाही!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

UGC Assistant Professor Recruitment 2021: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या सरळ भरतीसाठी एक जुलै 2023 पर्यंत पीएचडीची अट रद्द करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापकाच्या नियुक्तीसाठी किमान पीएचडीची पात्रता असणारी अट 2018 मध्ये युजीसीने जारी केली होती. यंदा पीएचडीची अट लागू होणार होती. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर युजीसीनं पीएचडी अनिवार्यची अट 2023 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै 2023 पर्यंत UGC NET स्कोअरच्या आधारावर पदभरती सुरू राहणार आहे. युजीसीच्या या निर्णायमुळे प्राध्यापक बनू इच्छिणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

युजीसीने घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे रिक्त प्राध्यापकांची पदं लवकर भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दीड वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे युजीसीने किमान पीएचडी या अटीला तुर्तास पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे NET, SET, SLET सह शिक्षक पात्रता परीक्षांसाठी पात्र ठरतात ते सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. ज्या उमेदवारांनी यूजीसी निकषांनुसार P-hd पदवी घेतली आहे अशा उमेदवारांना NET, SET, SLET च्या किमान पात्रतेच्या अटींमधून सूट दिली जाणार आहे.

पीएच. डी, नेट, सेटधारकांना नोकरीच्या संधी

विद्यापीठात अनुदान आयोगाने खास पीएच.डी., राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट), राज्य पात्रता परीक्षा (सेट) धारकांसाठी पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांना आपले प्रोफाइल तयार केल्यानंतर उमेदवारांना विविध कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये रिक्त जागांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे नेट, सेट धारक आणि नोकरीच्या शोधात असणारे उमेदवार या पोर्टलवर अर्ज करू शकणार आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रशासकीय, कार्यालयीन कामकाजाबाबत नोकऱ्या असणार आहेत. याद्वारे लेखापाल, आरोग्य, अभ्यासिका अशा विभागात नोकरी मिळणे शक्य होणार आहे. याची माहिती जॉब पोर्टलवर अपलोड केली जाईल. याबाबत अधिक माहिती ‘www.ugc.ac.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

loading image
go to top