पिसा चाचणी आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा स्कोअरबोर्ड

हेरंब कुलकर्णी
Thursday, 12 December 2019

एखाद्या देशाने स्वीकारलेली शिक्षणपद्धती किंवा तेथे दिले जाणारे शिक्षण हे जगाच्या नकाशावर किती प्रभावी आहेस असे प्रश्‍न अनेकदा शिक्षणक्षेत्राशी संबंधित अनेकांच्या मनात सतत येतात. जगभरात कोणत्या देशातील शिक्षणव्यवस्था अधिक प्रभावीपणे काम करते याचे ज्ञान कोणत्या देशातील विद्यार्थी अधिक प्रगती करतात यातून मिळणे शक्य आहे. अर्थातच सर्वांगीण विकास साध्य झालेल्या विद्यार्थ्यांकडून कोणताही देश अधिक कार्यन्विततेची अपेक्षा करू शकतो.

जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, परदेशी शिक्षण विषयक अभ्यासक, फिनलँड
एखाद्या देशाने स्वीकारलेली शिक्षणपद्धती किंवा तेथे दिले जाणारे शिक्षण हे जगाच्या नकाशावर किती प्रभावी आहेस असे प्रश्‍न अनेकदा शिक्षणक्षेत्राशी संबंधित अनेकांच्या मनात सतत येतात. जगभरात कोणत्या देशातील शिक्षणव्यवस्था अधिक प्रभावीपणे काम करते याचे ज्ञान कोणत्या देशातील विद्यार्थी अधिक प्रगती करतात यातून मिळणे शक्य आहे. अर्थातच सर्वांगीण विकास साध्य झालेल्या विद्यार्थ्यांकडून कोणताही देश अधिक कार्यन्विततेची अपेक्षा करू शकतो. या सर्व परिस्थितींचा विचार करूनच या सर्व प्रश्‍नांच्या समाधानासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक संस्था काम करते. ‘ओईसीडी’ ही संस्था (Organisation for Economic Co-operation and Development (OECD) प्रतिवर्षी ‘पिसा’ (Programme for International Student Assessment (PISA) नावाची मूल्यांकन चाचणी घेते. ही चाचणी जगातील सर्वांत जास्त प्रसिद्ध असलेली, लहान मोठ्या अशा १५४ देशांपर्यंत पोचलेली आहे. या प्रकारच्या आढाव्यामध्ये तब्बल ७९ देश विविध पद्धतीने या सहभागी होतात. या चाचणीत विविध देशातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा अभ्यास केला जातो. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक संबंध कसा आहे, शैक्षणिक आदान-प्रदानाच्या दृष्टीने प्रत्येक देश कशाप्रकारे सकारात्मक आहे, त्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय सहभागासाठी विद्यार्थी किती प्रमाणात प्रगतीशील किंवा सक्षम आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये विद्यार्थ्यांची क्षमता कशा प्रकारे वाढते आहे, कोणते घटक या क्षमतेवर परिणाम करतात आणि कोणत्या पद्धती त्यासाठी अधिक परिणामकारक ठरतात याविषयी ही परीक्षा चाचणी महत्त्वाची ठरते. या चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतिवर्षी अभ्यासाचा किंवा विचार करण्याचा प्रमुख घटक हा वेगवेगळा असतो.

अशाप्रकारच्या चाचणीचा प्रथम निकाल २०००मध्ये जाहीर झाला. यामध्ये विज्ञान गणित आणि भाषा या तीन विषयांचा विचार केला गेला होता. या चाचणीचा २०१५मध्ये भर विज्ञान आणि गणित या विषयांवर होता. मागील भाषा विषयावर या चाचणीमध्ये भर दिला गेला. वाचन कौशल्य आणि आकलनक्षमता असा नुकत्याच झालेल्या चाचणीचा विषय होता. चाचणीसाठी वाचन कौशल्याचा विचार करताना मात्र शब्दवाचन असे गृहीत न धरता, ‘वाचन’, ‘आकलन’ त्यावरील ‘चिंतन’ आणि त्यानुसार ‘अनुमान’ काढून ‘क्रिया’ या आणि त्यानंतर या सर्वांचा ‘सारासार विचार करून सारांश’ या सर्व मुद्द्यांचा यात समावेश केला गेला. याहीपुढे जाऊन फक्त पाठ्यपुस्तकातील विषय पुरेसा नसून सध्याच्या कालच्या आंतरजालीय लेखांचा विचार, विविध प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणाऱ्या शिक्षणविषयक माहितीचा विचारही या चाचणीत केला गेला. या घटकांतील सत्यासत्यता पडताळून त्यांच्याविषयीही ‘अनुमान’ आणि ‘सारांश’ यांचा विचार विद्यार्थ्यांना करता येतो का याचीही पडताळणी केली. यात काही चमत्कृतीपूर्ण आणि विशेष निकाल हाती लागले. काही देशातील विद्यार्थी या सर्व प्रक्रियेमध्ये अपेक्षेनुरूप पात्र ठरले. ‘चीन’, ‘अल्बेनिया’, ‘कतार’ यांसारख्या काही प्रगतीशील देशांमध्ये या गोष्टींमध्ये सरासरी ९० टक्के विद्यार्थी प्रभावीपणे सफल होतात आणि अपेक्षानुरूप कार्य करतात. परंतु काही प्रगत अशा देशातील ‘वाचन’ आणि ‘आकलन’ क्षेत्रातील परिस्थिती अधिकच गंभीर दिसून आली. 

विद्यार्थ्यांना मिळालेले भरपूर गुण गुणवत्ता वाढण्यास उपयुक्त ठरतील असे नाही, तर ‘लर्निंग टू लर्न’ ही प्रक्रिया शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल, असेच २०१८च्या ‘पिसा’ चाचणीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच भारतात नववी ते बारावीचे शिक्षण अधिक विषयानुभवी आणि विचारप्रवण असावे यावर नव्या शैक्षणिक धोरणात भर गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pisa test international education score board