PM YASASVI scholarship : शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM YASASVI scholarship

PM YASASVI scholarship : शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आणली आहे. NTA ने शालेय विद्यार्थ्यांकडून PM यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (YASASVI) साठी अर्ज मागवले आहेत.

YASASVI ही इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) आणि गैर-अधिसूचित, भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती (DNT/SNT) श्रेणीसाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केलेली शिष्यवृत्ती योजना आहे. इयत्ता ९वी मध्ये किंवा ११ वी मध्ये शिकणारे आणि ज्यांच्या पालकांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.

अशा प्रकारे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड होईल

YASASVI 2022 साठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी, NTA ११ सप्टेंबर रोजी MCQ स्वरूपात परीक्षा आयोजित करेल. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २७ जुलैपासून सुरू झाली असून, २६ ऑगस्ट रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. अधिकृत वेबसाइट yet.nta.ac.in वर जाऊन विद्यार्थी त्यांचा अर्ज भरू शकतात.

असा करा अर्ज

पायरी १ : अधिकृत वेबसाइट yet.nta.ac.in ला भेट द्यावी.

पायरी २ : यानंतर वेबसाइटवर दिलेल्या रजिस्टरच्या लिंकवर क्लिक करा.

पायरी ३ : आता तुमचे नाव, ईमेल, जन्मतारीख आणि पासवर्ड सबमिट करून खाते तयार करा.

पायरी ४ : आता लॉगिन वर क्लिक करा आणि अर्ज क्रमांक आणि पासवर्ड सबमिट करून लॉगिन करा.

पायरी ५ : त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा.

पायरी ६ : सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.

टॅग्स :scholarship scheme