
Maharashtra Police Recrutment 2022 : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने पोलीस दलातील सुमारे १४ हजारांहून अधिकची भरतीची घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील तरूणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी उरला आहे. त्यानुसार फक्त पोलीस शिपाई पदांसाठीची ही भरती प्रक्रिया १४,९५६ जागांसाठी असणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलिस दल व पोलिस वाहन चालक यांची स्वतंत्र भरती प्रक्रिया त्याचवेळी सुरू होणार आहे.
हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
यापूर्वी या भरतीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. मात्र, सततच्या सर्व्हर डाऊनमुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार उमेदवार १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
१५ डिसेंबर अखेरची मुदत
भरती प्रक्रियेची अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांना http://policerecruitment2022.mahait.org या वेबसाइटवर येत्या १५ डिसेंबरपर्यत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. कागदपत्रे, शैक्षणिक आर्हता, आरक्षण, परीक्षा शुल्क, प्रत्येक ठिकाणच्या रिक्ता जागांनुसारची भरतीची आहे. यासंदर्भात उमेदवारांना नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या ०२५३-२३०९७०० किंवा ०२५३-२२००४५० या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच, MahaIT हेल्पलाईन क्रमांक (सकाळी १०.३० ते सायं ०५. ०० या वेळेत) 022-61316418 यावरही संपर्क साधता येईल.
कसा भराल अर्ज?
या भरतीसाठी उमेदवाराला सर्वप्रथम policerecruitment2022.mahait.org या पोर्टलवर जावे लागेल.
त्यानंतर सूचना या टॅबवर क्लिक करावे. सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानंतर नोंदणीवर क्लिक करावे.
येथे आवश्यक तपशील भरून उमेदवाराला नोंदणी करता येईल. तुमच्या ई-मेल आयडी वर एक पडताळणी दुवा पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल.
आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.
चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेल्यास उमेदवाराला पुन्हा अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवाराला अर्ज रद्द ऑप्शनवर क्लिक करता येईल. मात्र, शुल्क भरणा केल्यानंतरच हा पर्याय उपलब्ध होईल, त्यामुळे उमेदवाराला तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल.
योग्य कारण देऊन तुम्ही अर्ज रद्द करू शकता आणि पुन्हा ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करून परीक्षेसाठी अर्ज करू शकता.
अशी होणार भरती
2019 पासून पोलीस भरती प्रक्रिया खोळंबली होती या पार्श्वमीवर इच्छुक उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पोलीस शिपाई पदासांठी होणाऱ्या या भरतीप्रक्रियेमध्ये प्रथम 50 गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यातील पोलीस घटकांची एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे.
शारीरीक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार 110 - प्रमाणात 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेत सुध्दा किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरीक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण 150 गुणांमधून केली जाणार आहे. कोरोना महामारीमुळे व इतर कारणानी पोलीस भरती प्रक्रिया लांबत गेली होती. उमेदवार खुप आशेने या भरती प्रक्रियेची वाट पहात होते आणि शासनाने सर्वात मोठी भरती प्रक्रिया सुरू केल्यामुळे उमेदवारांमध्ये उत्साहचे वातावरण आहे.
अर्जदाराने या सूचनाकडे द्यावे लक्ष
अर्जभरण्यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, शैक्षधणक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र तसेच NCC प्रमाणपत्र इत्यादी अर्हतेनुसार तयार ठेवावे.
अर्जदाराने त्याचा ई-मेल आयडी वा मोबाइल नंबर काळजीपूर्वजक निवडावा. भरती संदर्भात सर्व माहिती नोंदवलेल्या ई-मेल आयडी आणि मोबाईलवर पुरवण्यात येईल.
अर्जदारास पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई अशा एकू ण ३ पदांसाठी एकाच घटकात किंवा तीन वेगवेगळ्या घटकात आवेदन अर्ज सादर करता येईल. परंतु, एकाच घटकात एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करता येणार नाही.
अर्जदारास प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य असेल.
परीक्षेची निश्चित तारखी ही संकेत स्थळावर जाहीर केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.