
HSC Exams
Sakal
रीना भुतडा - करिअर समुपदेशक
बारावीचा टप्पा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा मानला जातो. या टप्प्यावर बोर्ड परीक्षांबरोबरच विविध प्रवेश परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना करावी लागते. त्यामुळे एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढावे लागते. सोबतच कोणती प्रवेश परीक्षा द्यावी व कोणत्या महाविद्यालय, कोर्ससाठी नोंदणी करावी? याविषयी विद्यार्थी व पालकांच्या मनात अनेकदा गोंधळ दिसून येतो.