संयम आणि तडजोड

संयम हा कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यास मदत करतो. विपरीत परिस्थितीत आपले मन आणि विचारधारा शांत ठेवून अतिशय संयमी राहून निर्णय घेण्याची कला अवगत करणे यशस्वी भविष्यासाठी आवश्यक आहे.
Patience
Patience Sakal
Updated on

डॉ. सचिन जैन - संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड

संयम हा कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यास मदत करतो. विपरीत परिस्थितीत आपले मन आणि विचारधारा शांत ठेवून अतिशय संयमी राहून निर्णय घेण्याची कला अवगत करणे यशस्वी भविष्यासाठी आवश्यक आहे. संयम हा प्रत्येकामध्ये जन्मजात नसतो, कधी तो शिकून, किंवा अनुभवाने वाढवावा लागतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. त्याचा खेळ नैसर्गिक आक्रमक, परंतु टेनिस एल्बो झाल्यानंतर आणि क्रिकेटची नियमावली बदलल्यानंतर त्याने आपला आक्रमक फटक्यांवर नियंत्रण आणून आपली प्रत्येक खेळी संयमाने उभारली. आपण हे कौशल्य विकसित करू शकतो. प्रत्येक जण तेंडुलकर नसतो किंबहुना तशी संधी सगळ्यांना मिळेल असेही नाही, परंतु प्रयत्न केले तर यश मिळण्याची शक्यता वाढते. सुतारपक्षीही याचे उत्तम उदाहरण आहे. तो चोच मारून मारून अतिशय संयमाने आम्हा वृक्ष कापून टाकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com