नोकरी सोडून आत्मविश्वासाने आलो पहिला - प्रमोद चौगुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pramod Chaugule

अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर एका खासगी कंपनीत नोकरीला लागलो. त्या दरम्यान स्पर्धा परीक्षेतून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एकदाही प्रयत्न केला नाही, याची सातत्याने मनाला खंत वाटत होती.

नोकरी सोडून आत्मविश्वासाने आलो पहिला - प्रमोद चौगुले

- अमोल अवचिते

पुणे - अभियांत्रिकीची (Engineer) पदवी प्राप्त केल्यानंतर एका खासगी कंपनीत नोकरीला (Job) लागलो. त्या दरम्यान स्पर्धा परीक्षेतून (Competition Exam) सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी एकदाही प्रयत्न केला नाही, याची सातत्याने मनाला खंत वाटत होती. ही खंत आयुष्यभर मनाला टोचू नये आणि आपली पात्रता असतानाही परीक्षा (Exam) दिली नाही, असे वाटत राहू नये, असा विचार करत स्पर्धा परीक्षेत पास होण्याचा उद्देश ठेवला. नोकरी सोडून आत्मविश्वास आणि अभ्यासात सातत्य ठेवत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत राज्यात पहिला आलो, असे प्रमोद चौगुले सांगतो.

कुटुंबासाठी नोकरी आवश्यक होती. स्पर्धा परीक्षा देण्याचाही विचार होता. आई-वडिलांना याबाबत कल्पना दिली. त्यावेळी दोघांनी, ‘तुला जे योग्य वाटते ते कर’, असा सल्ला दिला. त्यानंतर एकच ध्येय ठेवले ते म्हणजे स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेची तयारी सुरु केली. पाच वेळा मुलाखत देऊन अंतिम यश मिळवता आले नाही. मात्र निराश न होता एमपीएससीच्या राज्य सेवा परीक्षेत दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळविले, असे मुळ सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी गावाचा आणि सध्या पुण्यात राहणाऱ्या प्रमोदने सांगितले.

प्रमोद असे सांगतो की, यूपीएससी परीक्षेत अपयश का येत होते. नेमके कुठे चुकले हे समजले नाही. याचे विश्लेषणच करता आले नाही. त्यामुळे युपीएससीच्या परीक्षेतील अपयशावर उत्तर मिळाले नाही. मात्र राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करताना विश्लेषण केले. अभ्यासक्रम समोर ठेवून, नामांकित पुस्तकांचा आधार घेत अभ्यास केला. त्यामुळे अपेक्षित निकाल आला.’’

चुकांचे विश्लेषण करून यश

यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षा सोप्या नाहीत. मात्र युपीएससीची मुख्य परीक्षा लेखी असल्याने ती एमपीएससीच्या तुलनेत सोपी वाटली. मात्र, विश्लेषण करता आले नाही. त्या तुलनेत राज्य सेवेची मुख्य परीक्षा देताना खूप माहिती लक्षात ठेवावी लागते. नेमके उत्तर माहीत असावे लागते. या परीक्षेसाठी खूप शक्ती लागते. असे असले तरी या परीक्षेत झालेल्या चुकांचे विश्लेषण करता आले, म्हणून दुसऱ्या प्रयत्नांत यश मिळविण्यास मोठी मदत झाली, असे प्रमोद सांगतो.

प्रमोदच्या टिप्स

  • बाजारात अनेक दर्जेदार पुस्तके उपलब्ध आहेत. ती सरसकट वाचण्यापेक्षा अभ्यासक्रमानुसारच ती अभ्यासायला हवीत.

  • परीक्षेचे योग्य नियोजन, सातत्याने सराव आणि ध्येय निश्चित असेल तर नक्कीच यश मिळवता येते.

  • अपयश आले तर नैराश्य येतेच. मात्र ते झालेल्या चुका सुधारून घालवता येते.

Web Title: Pramod Chaugule First To Leave His Job With Confidence Success Motivation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top