
व्यक्तिमत्त्व विकास : प्रभावी संवाद काळाची गरज
- प्रणव मंत्री
संवाद हा आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोणत्याही व्यक्तीला जगात टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक कौशल्यांपैकी एक म्हणजे संवाद. प्रभावीपणे संवाद केल्याने तुम्ही केवळ तुमचा संदेश कोणाला तरी पोचवत नाही, तर त्यांना तुमच्या भावना योग्यरीत्या पोचवता. प्रभावीपणे संवाद साधण्यात सक्षम असणे हे जीवनातील सर्व कौशल्यांपैकी सर्वांत महत्त्वाचे आहे. संवाद आपल्याला इतर लोकांपर्यंत माहिती पोचवण्यास आणि आपल्याला काय सांगितले जाते ते समजून घेण्यास सक्षम करते. प्रभावी संवाद एखाद्या व्यक्तीला एक मजबूत व्यक्तिमत्त्व आणि निरोगी करिअर विकसित करण्यास मदत करते. मजबूत नातेसंबंध विकसित करण्यासही प्रभावी संवाद उपयुक्त ठरते.
चला तर मग जाणून घेऊयात प्रभावी संवादासाठी गरज असलेल्या 7C’s बद्दल :
1) Completeness (पूर्णता) ः संवाद पूर्ण असणे आवश्यक आहे. यात प्रेक्षकांना आवश्यक असलेली सर्व तथ्ये सांगितली पाहिजेत. संदेश पाठविणाऱ्याने प्राप्तकर्त्याची मानसिकता विचारात घेतली पाहिजे आणि त्यानुसार संदेश पोचवावा. संपूर्ण माहिती श्रोत्याला निष्कर्ष काढण्यास मदत करते. संदेश कोणताही असो, तो पुरेसा स्पष्ट असावा. संदेश हा वस्तुस्थितीचा असावा. क्लिष्ट असेल तर ते सोपे आणि समजण्यायोग्य करण्यासाठी अतिरिक्त स्पष्टीकरण किंवा तपशील असावेत.
2) Conciseness (संक्षिप्तता) ः संक्षिप्तता म्हणजे शब्दशैली, म्हणजे, संवादाचे इतर C न विसरता तुम्हाला व्यक्त करायचे आहे ते कमीत कमी शक्य शब्दांत सांगणे. प्रभावी संवादासाठी संक्षिप्तता आवश्यक आहे. संक्षिप्त संवाद श्रोत्यांना मर्यादित शब्दांमध्ये लहान आणि आवश्यक संदेश देतो. संवाद साधताना अनावश्यक शब्द वापरणे टाळा. त्याने तुमचा वेळ वाचतो आणि समोरच्याला कंटाळाही येत नाही.
3) Courtesy (सभ्यता) ः नेहमी विनम्रपणे सर्वांशी संवाद साधावा. एक सौहार्दपूर्ण वातावरण असावे. आपण एखाद्याला आदराने संबोधित करणे आवश्यक आहे. तुम्ही आदर दिलात तर तुम्हाला आदर मिळेल. सौजन्य म्हणजे संदेश प्राप्तकर्त्याच्या भावना आणि दृष्टिकोन विचारात घेणे.
4) Clarity (स्पष्टता) ः संवाद साधताना विचार स्पष्ट असल्याची खात्री करा. विचार आणि कल्पनांची पूर्ण स्पष्टता संदेशाचा अर्थ वाढवते. तुम्हाला भाषेत स्पष्टता आणायची असल्यास लहान वाक्ये आणि ठोस शब्द वापरा. अस्पष्ट भाषा टाळा. स्पष्ट बोलल्याने समोरच्यालाही व्यवस्थित माहिती मिळते.
5) Concreteness (ठोसपणा) : ठोस संप्रेषण म्हणजे अस्पष्ट आणि सामान्य ऐवजी विशिष्ट आणि स्पष्ट असणे. ठोसतेमुळे आत्मविश्वास मजबूत होतो. ठोस संदेश विशिष्ट तथ्ये आणि आकडेवारीसह समर्पित असले पाहिजेत. संवाद साधताना ठोसपणा असण्याचा फायदा म्हणजे तुमच्या संदेशाचा चुकीचा अर्थ लावला जात नाही.
6) Consideration (विचार) : कोणताही संवाद साधताना प्रेक्षकांचे दृष्टिकोन, पार्श्वभूमी, मानसिकता, शैक्षणिक पातळी यांचा विचार करावा. तुमचे प्रेक्षक, त्यांच्या गरजा, भावना तसेच समस्यांची कल्पना करण्याचा प्रयत्न करा. प्रेक्षकांचा स्वाभिमान राखला जाईल आणि त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. तुमचा संदेश पूर्ण करताना प्रेक्षकांच्या गरजेनुसार संदेशात तुमचे शब्द बदला. आपल्याला देवाने एकच तोंड आणि दोन कान दिले आहेत. म्हणजेच समोरच्याच ऐकणं पण तेवढंच गरजेचं आहे.
7) Correctness (अचूकता) : नेहमी योग्य भाषेचा वापर करा. लिखित व्यावसायिक संप्रेषणांच्या बाबतीत व्याकरणाच्या चुकांबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगा, तसेच शाब्दिक संवादाच्या बाबतीत क्रियापदांचा चुकीचा वापर करू नका. तुम्ही योग्य भाषा वापरता तेव्हा ते विश्वासार्हता वाढवण्यास मदत करते आणि समोरच्याचा तुमच्यावरील विश्वास वाढतो.
वरील C मध्ये Confidence (आत्मविश्वास) सामील केला नाही. तुम्ही तुमच्या संवादात सर्व C’sचा योग्यरीत्या अवलंब केल्यास तुमचा संवाद प्रभावी होईल आणि संवाद साधताना तुम्हाला आत्मविश्वास वाटेल.
Web Title: Pranav Mantri Writes Need For Effective Communication Time
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..