
मालवेयर (Malware) अटॅक सायबर हल्यांच्या सामान्य प्रकारांमधील एक आहे. विद्वेषपूर्ण सॉफ्टवेअरला मालवेयर असे म्हटले जाते.
नोकरी, बाजारपेठ : संगणक सुरक्षितता...
- प्रशांत लिखिते
मालवेयर (Malware) अटॅक सायबर हल्यांच्या सामान्य प्रकारांमधील एक आहे. विद्वेषपूर्ण सॉफ्टवेअरला मालवेयर असे म्हटले जाते. मालवेयक हे हॅकर्सद्वारा बनवलेला अतिशय घातक कॉम्प्युटर सॉफ्टवेअर प्रोग्रॅम असून इंटरनेट युजरला त्रास देण्यासाठी आणि सिस्टीमला खराब करण्याच्या हेतूने तयार केला आहे. ‘फिशिंग’ हा सायबर हल्ल्याचा एक प्रकार आहे. यामध्ये सायबर अपराधी युजरला फेक मेल किंवा मेसेजच्या माध्यमाने लिंक पाठवतो. त्याद्वारे वापरकर्त्याची वैयक्तिक माहितीला चोरू शकतो.
पूर्वी कॉम्प्युटरवर फाइल्स इकडं तिकडे नेण्यासाठी काळी फ्लॉपी वापरत. त्यातून केवळ ५०-१०० एमबी फाइल्स शेअर करता येत असे. आज तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की आपण क्षणात सेकंदात गाणी, व्हिडिओ, मुव्हीज फाइल्स, पीडीएफ, वर्ड, एक्सेल फाइल्स शेअर करू शकतो. क्लाऊड कॉम्प्युटिंग ही सेवा वापरकर्त्याला जगभरात कोठेही, कोणतेही सर्व्हर, आपले ॲप्स, संगणक प्रणाली म्हणजे सॉफ्टवेअर, माहिती, डेटाबेस हे इंटरनेटद्वारे उपलब्ध होऊ शकतात.
क्वांटम संगणक
क्वांटम कॉम्प्युटर हे कॉम्प्युटर प्रणालीमधील उपकरण असून, त्यात क्वांटम यांत्रिकी प्रणालीचा वापर केला जातो. क्वांटम कॉम्प्युटरमध्ये बाइट्सऐवजी क्वॉइबिट्स असतात. क्वांटम कॉम्प्युटर एकावेळी अनेक माहितीच्या बिट्सवर काम करता येते. यामुळे कॉम्प्युटर समांतरता वाढते. या प्रणालीमुळे माहितीची देवाणघेवाण, साठवण, प्रक्रिया सुरक्षितरीत्या करता येईल. सुपर कॉम्प्युटर हाताळताना सर्व कामे वेगाने क्वॉइबिट्सच्या माध्यमातून होऊ शकतात. या माध्यमातून अति गुंतागुंतीचे गणिती सिद्धांत मांडले जाऊ शकतील. कॉम्प्युटरीय मॉडेलच्या आधारे वैद्यकीय आजारावरील कारणे शोधता येतील.
ब्लॉकचेन
ब्लॉकचेन ही माहिती रेकॉर्ड करण्याची प्रणाली असून यामध्ये प्रणाली बदलणे, हॅक करणे किंवा फसवणे अशक्य करते. ब्लॉकचेन हे मूलत-: व्यवहारांचे डिजिटल लेजर असते जे ब्लॉकचेनवरील संगणक प्रणालीच्या संपूर्ण नेटवर्कवर डुप्लिकेट केले जाते आणि वितरित केले जाते. बिटकॉइन आणि इथरियम ही ब्लॉकचेनची लोकप्रिय उदाहरणे आहेत.
आपल्याकडे घरगुती व्यवहार टिपण्यासाठी वही असते त्याप्रमाणे ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे डिजिटल वहीसारखे आहे. आपण करत असलेले देवाणघेवाण व्यवहार हे प्रत्येक ब्लॉक स्वरूपात या डिजिटल लेजरमध्ये साठविलेले असतात आणि त्यांना एकमेकांसोबत जोडलेले देखील असते.
सध्या आपण बँक आणि त्यातून पैसे पाठविणे यासारख्या गोष्टी करतो, त्यासाठी आपल्याला बँकेशी संबंध येतो. मात्र ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरल्यानंतर हे थर्ड पार्टी घटक आपल्याला लागणार नाहीत. आपल्याला आपली माहिती कोणाला द्यायची आहे किंवा कशी द्यायची आहे हे आपण स्वत- ब्लॉकचेनमध्ये ठरवू शकतो. त्यामुळे आपला डेटा एखाद्या थर्ड पार्टी कंपनीला मिळण्याची शक्यता फार कमी होते आहे. आपल्याला थोडेफार सुरक्षित राहायचे असल्यास ब्लॉकचेन हाच योग्य पर्याय आहे.
फाइव्ह जी
हे सेल्युलर तंत्रज्ञानाचे नवीनतम पुनरावृत्ती आहे. वायरलेस नेटवर्कचा वेग आणि प्रतिसाद वाढवण्यासाठी ते तयार केले आहे. या टेक्नॉलॉजीच्या वाढत्या मागणीमुळे माहिती तंत्रज्ञान उद्योगासाठी अनेक संधी उपलब्ध होतील. आता असं स्वप्न रंजन करायला हरकत नाही, की मी माझ्या ऑफिसात काम करतो आहे. सर्व काही व्यवस्थित आहे. मनगटावर बांधलेलं स्मार्ट वॉच माझा हार्ट रेट, पल्स, ब्लड प्रेशर, शुगर, क्रिएटनाईन वगैरे पॅरामीटर्स जवळच्या इस्पितळाला कळवत आहेत.
कोणताही शारीरिक सिमटर्म नसताना येऊ शकणाऱ्या हार्ट अटॅकची चाहूल घेऊन हॉस्पिटल ते माझ्या बॉसला आणि कुटुंबाला कळवते. एक सुसज्ज रुग्णवाहिका ऑफिसच्या दारात माझं नुकसान होण्यापूर्वीच हजर होते. बघूया भविष्यात काय घडतं ते. हे बदल नवनवी आव्हाने या क्षेत्रात संधी निर्माण करणारी आहेत. तिचा लाभ घेण्यासाठी सदैव सज्ज असावे.
(लेखक टीसीएस कंपनीचे सरव्यवस्थापक (एच. आर.) असून, गेली २५ वर्षे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.)