

The Evolution of Computer Engineering in the Era of Digital Revolution
Sakal
प्रा. प्रतीक्षा वाघ (अभियांत्रिकी संशोधक)
करिअर मंत्र
संगणक अभियांत्रिकी हे आजच्या आधुनिक युगातील महत्त्वाचे आणि मागणी असलेले करिअर क्षेत्र आहे. या शाखेत संगणक विज्ञान (Computer Science) आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी (Electronic Engineering) यांचा संगम असतो. संगणक अभियांत्रिकीतील अभियंते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रांत काम करतात. संगणक, मोबाईल फोन, स्मार्ट उपकरणे, रोबोट्स, इंटरनेट प्रणाली यांसारखी तंत्रज्ञान विकसित व सुधारण्याचे काम ते करतात. आज शिक्षण, आरोग्यसेवा, बँकिंग, दळणवळण, वाहतूक आणि मनोरंजन अशा जवळजवळ सर्वच क्षेत्रांत संगणकांचा वापर होत असल्यामुळे संगणक अभियांत्रिकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.