परदेशी शिकताना : सारथीची नवी शिष्यवृत्ती योजना

राज्य शासनाने ‘सारथी’व्दारे विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्याविषयी शिष्यवृत्ती योजना जाहीर केलेली आहे.
sarathi scholarship logo
sarathi scholarship logosakal

- ॲड. प्रवीण निकम

उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रवासात शिष्यवृत्ती-फेलोशिप महत्त्वाची ठरते. राज्य शासनाने ‘सारथी’व्दारे विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्याविषयी शिष्यवृत्ती योजना जाहीर केलेली आहे. शासन निर्णयानुसार इतर प्रवर्गातील शिष्यवृत्ती योजनांसोबतच आता मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी ‘सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना’ आधार ठरणार आहे. त्याविषयी जाणून घेऊयात.

पदवी, पदव्युत्तर व डॉक्टरेट अशा शाखानिहाय विविध विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. अभियांत्रिकी, वास्तुकला, व्यवस्थापन, विज्ञान, वाणिज्य-अर्थशास्त्र, कला, विधी, औषध निर्माण अशा शाखांचा समावेश आहे. परदेशात नामांकित असलेल्या सर्व अभ्यासक्रमाचा समावेश सयाजीराव गायकवाड सारथी स्कॉलरशिप योजनेमध्ये केलेला आहे.

या अंतर्गत दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज स्वीकारण्यात येणार असून त्याकरिता https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. यातील अर्जांची छाननी केल्यानंतर विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. याकरिता काही अटी व निकष आहेत.

  • परदेशातील विद्यापीठ/शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी असावा.

  • त्याने कोणत्याही राज्य अथवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.

  • विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास असणे अपेक्षित आहे तर इच्छित असणारे विद्यापीठ हे THE (Times Higher Education) किंवा QS (Quacquarelli Symonds) या पद्धतीच्या मानांकांमध्ये २०० नंबरच्या आत असावे.

  • पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांच्या वयाची कमाल ३५ वर्षे आणि पीएच.डी अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांच्या वयाची ४० वर्षे वयोमर्यादा असावी.

  • पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ६० टक्के गुणांसहित पदवी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

  • एकत्रित वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

वरील पात्रता व निकषात बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सर्व शैक्षणिक कागदपत्रे, उत्पन्नाचा दाखला, पदवी/पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक, दोन भारतीय नागरिकांचे जामीनपात्र, परदेशी शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे विनाअट ऑफर लेटर, नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले आरोग्य चांगले असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे असावीत. यामुळे शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना नक्कीच मदत होऊ शकते. परदेशी शिक्षणासाठी अर्ज करू इच्छित खुल्या गटातील मुलांना यामुळे शैक्षणिक खर्च, निवासी व भोजन खर्च, निर्वाह भत्ता अशा विविध गोष्टी मिळणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com