परदेशी शिकताना : युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे महत्त्व

महात्मा गांधीसारख्या अनेक महामानवांच्या शैक्षणिक इतिहासाचा वारसा लाभलेले इंग्लंडच्या लंडन शहरातील उच्च शिक्षणाला गती देणारे असे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL).
University College London
University College Londonsakal

- ॲड. प्रवीण निकम

महात्मा गांधीसारख्या अनेक महामानवांच्या शैक्षणिक इतिहासाचा वारसा लाभलेले इंग्लंडच्या लंडन शहरातील उच्च शिक्षणाला गती देणारे असे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL). शैक्षणिक उत्कृष्टता, नावीन्य, आंतरराष्ट्रीय स्तरावर डिजिटल आणि मिश्रित दूरस्थ शिक्षण, समृद्ध ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि संशोधनावर मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनची स्थापना १८२६मध्ये झाली. विद्यापीठाची वैविध्यपूर्ण विद्यार्थी संस्था समृद्ध सांस्कृतिक आणि बौद्धिक वातावरण हे विद्यार्थांच्या जडणघडणीत महत्त्वाचे ठरते.

जागतिक स्तरावरील सर्वोच्च विद्यापीठ

इंग्लंडमधील पहिले असे विद्यापीठ आहे जे अभियांत्रिकी, वास्तुकला, भाषा व संस्कृती, मानसशास्त्र, पत्रकारिता, इतिहास, गणित असे तब्बल ४०० हून अधिक असे विविध अभ्यासक्रम इकडे शिकवले जातात. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर या दोन्ही श्रेणीमध्ये हा अभ्यासक्रम चालतो. उत्कृष्ट अध्यापन आणि संशोधन क्षमतेच्या जोरावर जागतिक स्तरावरील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाचे नाव आहे. विद्यापीठाचा बहुविद्याशाखीय दृष्टिकोन विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनांचा शोध घेण्यास सक्षम करते.

संशोधनाचे महत्त्वाचे केंद्र

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये संशोधनाचे काम हे केंद्रस्थानी आहे. याठिकाणी विविध विषयांवर सातत्याने सकारात्मक बदल घडवून आणणारे संशोधन होत असते. प्रत्येक संशोधन कार्य हे योग्य मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली होत असल्याने त्याला एक जागतिक स्तराच्या दृष्टीने वेगळे स्थान प्राप्त होते.

चैतन्यमय सामाजिक व शैक्षणिक जीवन - शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्व स्तरातून घडणे आवश्यक असते असे म्हटले जाते. तेच वातावरण या विद्यापीठात बघायला मिळते. क्रीडा, कला व सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांचा क्रियाशील सहभाग या विद्यापीठाद्वारे घेता येतो. त्यामुळे तुम्हाला समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची, नेतृत्व गुण विकसित करण्याची संधी मिळते.

स्व-क्षमतेच्या ओळख

हे विद्यापीठ अनेक विद्याशाखांमध्ये विभागलेले आहे. आपल्या आवडीनुसार निवडलेल्या शाखेवर आधारित कोणत्या शैक्षणिक व नोकरीच्या संधी आहेत हे सांगण्यासाठी व्यक्तिगत मार्गदर्शक दिला जातो. त्यामुळे शैक्षणिक जीवनात विचारांना चालना देण्यासाठी आपली क्षमता ओळखण्यासाठी या सर्व सोयी सुविधांचा फायदा होतो. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कौशल्याधित शिक्षण घेणे सोपे जाते.

करिअर मार्गदर्शन

हे विद्यापीठ फक्त दर्जेदार शिक्षण देत नाहीतर विद्यार्थांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया तयार करते. दरवर्षी करिअर पोर्टल मार्फत ३७ हजार नोकरीच्या संधी, इंटर्नशिप, तसेच छोट्या-मोठ्या कामाच्या संधी दिल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण, मुलाखत कौशल्य आत्मसात करण्यास सोपे जाते.

यासाठी विद्यापीठात शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त मार्गदर्शन, मानसिक आरोग्य विकासासाठी उपक्रम, करिअरच्या वाटा सुकर करण्यासाठी विविध संसाधने आणि सोबतीला कायम एक समुपदेशक असतो. विद्यार्थी कोणत्याही अडचणींवर मात करून नावीन्याची कास धरतो. त्यामुळे परदेशी उच्च शिक्षणाचा विचार करत असताना तुमच्यापुढे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन हा सर्वोत्तम पर्याय आहे.

(लेखक समता सेंटर या स्वयंसेवी संघटनेचे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com