
Karnataka Government school: कर्नाटकमधील बेलगावी जिल्ह्यातील एक छोटेसे गाव 'अदहल्लटी' येथील सरकारी शाळेच्या प्रमुखाने विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठी एक अशी योजना केली आहे, जी ऐकून तुम्ही देखील त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. शाळेत विद्यार्थ्यांची कमी होत जाणारी संख्या पाहता, मुख्याध्यापकानी ठरवले की ते येथे येणाऱ्या प्रत्येक नवीन विद्यार्थ्याच्या नावावर 1000 रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट करतील.