६ वर्षे जर्मन बँकेत नोकरी करणारी प्रियंवदा आज IAS बनलीय

प्रियंवदा मुंबईकर असून तिचे शिक्षण माटुंग्याच्या डी. जी. रुपारेल महाविद्यालयात झाले आहे. त्यानंतर तिने Veermata Jijabai Technological Institute येथून अभियांत्रिकीची पदवी शिक्षण पूर्ण केले.
Priyamvada Mhaddalkar
Priyamvada Mhaddalkargoogle

मुंबई : UPSC परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदाचा निकाल महाराष्ट्रासाठी विशेष महत्त्वाचा आहे. मराठी तरुणांचा सहभाग कमी असणाऱ्या या परीक्षेत प्रियंवदा म्हाडदळकर या मराठमोळ्या मुलीने तेराव्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसऱ्या प्रयत्नात प्रियंवदाने हे यश मिळवले आहे.

प्रियंवदा मुंबईकर असून तिचे शिक्षण माटुंग्याच्या डी. जी. रुपारेल महाविद्यालयात झाले आहे. त्यानंतर तिने Veermata Jijabai Technological Institute येथून अभियांत्रिकीची पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने IIM Banglore मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.

प्रियंवदाचे वडील शासकीय सेवेत होते. त्यांच्याकडून तिला सरकारी सेवेत जाण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे लहानपणापासूनच प्रियंवदाला आयएएस बनायचे होते. त्यासाठी तिने २०२० साली Investment Banking मधील नोकरी सोडली व यूपीएससीवरच लक्ष केंद्रित केले. प्रियंवदाने जर्मन भाषेचेही शिक्षण घेतले आहे. तसेच ६ वर्षे डॉएश्च बँकेत कामही केले आहे. तेथे ती Assistant Vice President या पदावर कार्यरत होती. सध्या ती बंगळुरू येथे राहात आहे.

नियमित अभ्यास आणि भरपूर सराव यांच्या बळावर हे यश प्राप्त केल्याचे प्रियंवदा सांगते. अभ्यास करताना तिने वैकल्पिक विषयांवर अधिक भर दिला. वैयक्तिक माहिती आणि चालू घडामोडी या गोष्टी मुलाखतीत महत्त्वाच्या असतात. मुख्य परीक्षेनंतरही प्रियंवदाने काही महिने कसून अभ्यास केला. मुलाखतीत मुद्देसूद बोलावं लागतं. हे सर्व लक्षात घेऊन मुलाखतीसाठी तयारी केल्याचे प्रियंवदाने प्रसारमाध्यमांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com