मानसवेध : अहंकाराचा वारा न लागो...

अहंकाराच्या पडद्यामागचं वास्तव; आत्मविश्वास, अभिमान आणि अहंकार यातील सूक्ष्म फरक उलगडत व्यक्तिमत्त्व घडवण्याचा मानसवेध
मानसवेध: अहंकार - प्रगतीचा मार्ग की विनाशाचे द्वार? स्वतःला आणि इतरांना दुखावणारा 'मी'पणा कसा ओळखाल? मानसतज्ज्ञांचे सडेतोड विश्लेषण

मानसवेध: अहंकार - प्रगतीचा मार्ग की विनाशाचे द्वार? स्वतःला आणि इतरांना दुखावणारा 'मी'पणा कसा ओळखाल? मानसतज्ज्ञांचे सडेतोड विश्लेषण

Sakal

Updated on

डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ

दृष्टीवर अहंकाराचा पडदा असला तर वस्तुस्थितीपासून, वास्तवापासून आपण नेहमी दूर रहातो. वास्तवापासून आपण दूर राहण्यात आपलंच नुकसान असतं. आपण स्वत:ला दुखावतोच पण इतरांनाही दु:खी करतो. सुखी, आनंदी, समाधानी आणि आतून खऱ्या अर्थानं कणखर व्हायचं असल्यास अहंकारावर नियंत्रण ठेवावं लागेल. प्रत्येकात काही प्रमाणात अहंकार असणारच. परंतु तो फक्त आपलं अस्तित्व निदर्शक असावा. फ्राईडने म्हटल्याप्रमाणे अहंकार हा व्यक्ती व जग यामधील दुवा आहे. परंतु तो तेव्हढ्यापुरताच असावा. अनेकदा आपण आत्मविश्वास असणं, अभिमान असणं आणि अहंकार असणं यामध्ये गल्लत करतो. कधी कधी आपल्याला कळत असूनही आपण असं करतो. कारण पुन्हा आपला अहंकार जपण्याचाच हा एक प्रयत्न असतो.

अहंकारी व्यक्ती दोन प्रकारे आढळतात. एक बाहेरून खूप छान वाटणारी परंतु आतून सतत छुपा अहंकार बाळगणारी. अशा व्यक्ती विलक्षण आतल्या गाठीच्या असतात. परंतु बाह्य वैशिष्ठ्यांवरून सर्वसाधारणपणे अहंकारी व्यक्ती ओळखायची कशी? साधारणपणे पुढीलपैकी एक किंवा अनेक वैशिष्ठ्य अशा व्यक्तींमध्ये जाणवतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com