Pune University : प्रथम वर्ष बीबीए, बीसीए परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्याचे आदेश
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून नव्याने सुरू झालेल्या अभ्यासक्रमांच्या उन्हाळी प्रथम वर्ष परीक्षा (द्वितीय सत्र) महाविद्यालय स्तरावर आयोजित करण्याची सूचना पुणे विद्यापीठाने दिली.
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या सर्व महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त संस्थांनी नव्याने सुरू झालेल्या बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घ्याव्यात, असा आदेश विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिला आहे.