
Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पदासाठी होणाऱ्या ‘राज्यस्तरीय पात्रता परीक्षे’त (सेट) आरक्षणाच्या धोरणातून विशेष मागास प्रवर्गासाठी (एसबीसी) असणारे आरक्षण काढून टाकण्यात आले आहे. सेट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून ‘एसबीसी’चे आरक्षण नसल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.