Pune University : टाईम्स रॅंकिंगमध्ये पुणे विद्यापीठ आशियामध्ये पहिल्या दोनशेत!

रॅंकिंगमध्ये १०४ देशांमधील एक हजार ७९९ विद्यापीठांचे विश्लेषण
pune unversity rank Times Higher Education Ranking 2023 education pune
pune unversity rank Times Higher Education Ranking 2023 education puneesakal
Updated on

पुणे - देशातील नॅशनल इस्टिट्युट रॅंकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) नंतर जागतिक स्तरावरील महत्त्वाचे असणारे ‘टाईम्स हायर एज्युकेशन रॅंकिंग २०२३’ जाहीर झाले असून यात बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्था (आयआयएस) जागतिक पातळीवरील शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत २५१-३०० रॅंकिंगमध्ये आहे.

तर जागतिक स्तरावर पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ६०१-८०० रॅंकिंगमध्ये, तर भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसर) हे १००१-१२०० रॅंकिंगमध्ये आहे. जगभरातील उच्च शिक्षण संस्थांच्या दर्जाचे मानाकंन टाईम्स हायर एज्युकेशन यांच्या वतीने दरवर्षी करण्यात येते.

यात जगभरातील पहिल्या एक हजार शिक्षण संस्थांची क्रमवारी जाहीर करण्यात येते. यात प्रामुख्याने अध्यापन, संशोधन, संशोधनाचा प्रभाव, ज्ञानाचा हस्तातंरण, आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन असे निकष पाहिले जातात. यंदा या रॅंकिंगमध्ये १०४ देशांमधील एक हजार ७९९ विद्यापीठांचे विश्लेषण करण्यात आले.

pune unversity rank Times Higher Education Ranking 2023 education pune
Pune University : नॅक नसलेल्या महाविद्यालयात प्रवेश बंदी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परिपत्रक

जागतिक क्रमवारीत ऑक्सफर्ड विद्यापीठाने गेल्या सहा वर्षांपासून असणारे आपले पहिल्या क्रमांकाचे स्थान यंदाही कायम ठेवले आहे. तर हार्वर्ड विद्यापीठ दुसऱ्या, तर केंब्रिज विद्यापीठ आणि स्टॅन्डफर्ड विद्यापीठ हे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पुणे विद्यापीठ आशिया खंडात पहिल्या दोनशेत

अशिया खंडातील विद्यापीठाच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दोनशेमध्ये आहे. आशियामधील विद्यापीठाच्या रॅंकिंगमध्ये पुणे विद्यापीठ १९०व्या स्थानावर आहे, तर गेल्यावर्षी ते २०१-२५०च्या रॅंकिंगमध्ये होते.

pune unversity rank Times Higher Education Ranking 2023 education pune
Pune Police: पोलिस आयुक्त रितेश कुमार अ‍ॅक्टिव मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षिततेसाठी उचललं पाऊल

एनआयआरएफमध्ये विद्यापीठाची क्रमवारी घसरल्याचे पहायला मिळाले होते, मात्र जागतिक स्तरावरील रॅंकिंगमध्ये विद्यापीठाचा दर्जा उंचाविला आहे. तर जागतिक विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ २०२२मध्ये ८०१-१००० स्थानामध्ये होते, यावर्षी (२०२३) विद्यापीठाने ६०१ ते ८०० च्या दरम्यान स्थान मिळविले आहे.

अशिया खंडातील विद्यापीठांच्या रॅंकिंगमध्ये देशातील भारतीय विज्ञान संस्था (बंगळूर) ४८ व्या स्थानावर आहे. तर या रॅंकिंगमध्ये पहिल्या शंभरात जेएसएस ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (कर्नाटक) ६८व्या, शोलिनी युनिर्व्हसिटी ऑफ बायोटेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट सायन्सेस (हिमाचल प्रदेश) ७७ व्या, तर महात्मा गांधी युनिर्व्हसिटी (केरळ) ९५व्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com