- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
यशस्वी होण्यासाठी विविध कौशल्ये विकसित करावी लागतात तसेच आपला उद्देश गाठण्यासाठी त्याची आवड आवश्यक आहे. आपल्या आवडीचे उद्दिष्ट साकारण्यासाठी चिकाटी आणि दृढनिश्चयही आवश्यक आहे. वि. स. खांडेकरांनी ‘अमृतवेल’मध्ये अतिशय सुंदर शब्दांत आयुष्याच्या संघर्षाचे वर्णन केले आहे.
‘भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही! मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावं, म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं, तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळं!’
भारताचे राष्ट्रपती आणि प्रसिद्ध वैज्ञानिक ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी युवकांना आवाहन केले होत की स्वप्ने ही दिवसा उघड्या डोळ्यांनी बघायची असतात. स्स्वप्ने बघणे सोपे आहे, जर हेच स्वप्न आपण जीवनाचे उद्दिष्ट ठेवले आणि ते साकारण्यासाठी जिद्द आणि चिकाटी ची सोबत असेल तर यश निश्चित आहे.
या आधीच्या लेखामध्ये आपण करिअर कसे निवडायचे आणि निगडित कौशल्ये, अभ्यास करा करायचा याची माहिती घेतली. आपले करिअर, उद्दिष्ट गाठण्यासाठी आवडीने व चिकाटीने प्रयत्न महत्त्वाचे आहे.
यशस्वी भविष्यासाठी आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी, आपले उद्दिष्ट स्पष्ट असावे आणि ते आपल्या आवडीचे असणे महत्त्वाचे आहे. आपल्याला काय नको आहे ते ओळखणे गरजेचे आहे. आपल्या आवडीचे करिअर चिकाटीने आणि जिद्दीने पूर्ण करू शकता. कुठलेही ही काम आवडीने करायला लागले की त्यात यश निश्चित. मग ते छोटे असो वा मोठे! अभ्यासापासून ते ऑफिसमध्ये नवनवीन टास्क असोत.
आवडीला चिकाटी आणि दृढनिशयाची सोबत मिळाली तर मग ‘सोने पे सुहागा.’ ‘There is no shortcut to success’
आपल्या अंतिम उद्दिष्टाला लहान-लहान भागात विभाजित केले म्हणजे एक-एक पायरी सर करणे सोपे होते.
छोटे छोटे उद्दिष्ट गाठणे सोपे आणि सरळ असते.
चिकाटी आणि निश्चयाने प्रयत्न केल्यास लांबचा पल्ला गाठता येतो.
आपले उद्दिष्ट असे ठेवा की ज्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि तो आपले तसेच इतरांवर आयुष्य सुकर करेल. बायोकॉनच्या अध्यक्षा मजुमदार यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला म्हटले होते की मला करोडपती नाही व्हायचे तर करोडो लोकांचा जीवनात एक चांगला बदल आणायचा आहे.
त्यादृष्टीने त्यांनी आपल्या कंपनीची रचना केली. अशीच स्वप्ने आणि उद्दिष्टे समोर ठेवली तर आपण जगावेगळे असे करू शकाल. ‘Dare to dream’ जग त्यांचे आहे, जे स्वप्न पाहण्याची हिंमत करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.