खुशखबर! PWD विभागात सरकारी नोकरीची संधी; 'या' पदांवर लागणार लाॅटरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PWD Goa Recruitment 2021

पीडब्ल्यूडी विभागात सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातम्या!

खुशखबर! PWD विभागात सरकारी नोकरीची संधी; 'या' पदांवर लागणार लाॅटरी

PWD Goa Recruitment 2021 : पीडब्ल्यूडी विभागात सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातम्या! PWD विभाग, गोवा सरकारने 368 ग्रुप C पदांच्या भरतीसाठी नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केलीय. विभागानं जारी केलेल्या जाहिरातीनुसार, (No.4/2/2021/PCE-PWD-Tech Cell) पात्र उमेदवारांकडून भरतीअंतर्गत विविध विभागांमध्ये तांत्रिक सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 368 जागांसाठी अर्ज मागविले आहेत. ही सर्व पदे गोवा सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात PWD विभागाद्वारे भरली जाणार आहेत.

'या' तारखेपर्यंत ऑनलाइन अर्ज करा

याबाबतच्या अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार गोवा पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकृत वेबसाइटला pwd.goa.gov.in भेट देऊ शकतात. त्यानंतर संबंधित भरतीच्या जाहिरात लिंकवर क्लिक करून आपला ऑनलाइन अर्ज गोवा सरकारच्या संगणक आधारित परीक्षा प्रणाली (CBES) पोर्टलवर भरू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख आज (27 सप्टेंबर 2021) आहे.

हेही वाचा: दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत 3 हजार जागा; परीक्षेशिवाय मिळणार 'नोकरी'

पोस्टनिहाय रिक्त पदांची संख्या

  • तांत्रिक सहाय्यक (नागरी) - 85 पदे

  • तांत्रिक सहाय्यक (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) - 14 पदे

  • तांत्रिक सहाय्यक (खाणकाम) - 1 पद

  • तांत्रिक सहाय्यक (संगणक/ इलेक्ट्रॉनिक्स/ माहिती तंत्रज्ञान) - 31 पदे

  • कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) - 162 पदे

  • कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) - 51 पदे

  • कनिष्ठ अभियंता (संगणक/ इलेक्ट्रॉनिक्स/ माहिती तंत्रज्ञान) - 24 पदे

पात्रता जाणून घ्या..

तांत्रिक सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी उमेदवाराने व्यापारात अभियांत्रिकी पदवी मिळवलेली असावी. तसेच, अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवारांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. दरम्यान, राज्याच्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वरच्या वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल.

loading image
go to top