

India Shines in QS World University Sustainability Rankings 2027 with 99 Institutions
esakal
QS Sustainability Rankings 2027: जागतिक उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात भारतीय शिक्षण संस्थांनी पुन्हा एकदा आपली दमदार उपस्थिती नोंदवली आहे. 'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी सस्टेनेबिलिटी रँकिंग २०२७' (QS World University Sustainability Rankings 2027) नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये भारताच्या ९९ उच्च शिक्षण संस्थांनी मानाचे स्थान मिळवले आहे. पर्यावरण संरक्षण, सामाजिक प्रभाव आणि सुशासन या निकषांच्या आधारावर ही क्रमवारी ठरवली जाते.
यावर्षीच्या यादीत भारतीय तंत्रज्ञान संस्थान (IIT) दिल्लीने देशात प्रथम स्थान पटकावले आहे. आयआयटी दिल्लीला जागतिक स्तरावर १९४ वी रँक मिळाली आहे. यानंतर आयआयटी खड़गपुर आणि दिल्ली विद्यापीठाने अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे.