आॅनलाइन शिक्षणात कुतूहल जिवंत ठेवण्यासाठी!

online-education
online-education

कोणत्याही शिकण्याचं मूळ कुतूहल अथवा जिज्ञासा असते. लहानपणापासून आपण अनेक गोष्टी शिकतो... सायकल शिकतो, पोहायला शिकतो अथवा एखादा खेळ शिकतो. या सगळ्यात आपल्याला ते शिकायला आवडत असतं, आपण चुका करत, धडपडत शिकतो. आपल्यात निसर्गत: असलेली जिज्ञासा जिवंत असते. शालेय अभ्यासक्रम शिकतानाही कुतूहल हेच मूळ नैसर्गिक भांडवल असतं. त्यामुळेच अभ्यासक्रमातले अनेक विषय आपण नकळत शिकत जातो. अर्थात, विषयांच्या परीक्षा द्यायला लागल्यावर त्याचा परत परत सराव करणं मुलांना बोअर वाटतं. त्यामुळं काहीही शिकायचं असल्यास अगदी थोड्या प्रमाणात का होईना कुतूहल आवश्यक असतं. हेच जिवंत ठेवणं; म्हणजेच शिकण्याची आस जिवंत ठेवणं. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्याच्या परिस्थितीत हेच खूप अवघड जातंय. ऑनलाइन शिक्षणाचे जे विविध प्रयोग व प्रयत्न चालू आहेत; त्यामध्ये कुतूहल निर्माण करणं, हे एक आव्हान आहे. अभ्यासक्रम बोअर होतो आणि समजतही नाही. त्यामुळे मुलं व शिक्षक त्याबाबत असमाधानी आहेत. परिणामतः मुलं शिक्षणाकडून दुरावली जात आहेत अथवा केवळ उपचार म्हणून जोडलेली आहेत.

या परिस्थितीतही मुलांना काही रंजक व आकर्षक शैक्षणिक आशय मिळाल्यास त्यांचं कुतूहल टिकून राहण्यात उपयोग होईल. याच विचारानं ‘मंथन लर्निंग रिसोर्सेस’ दोस्ती गणित व भाषेशी हा प्रकल्प इयत्ता पाचवीच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमधून राबवत आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांचे व शाळांचे एकत्र व्हॉट्सॲप ग्रुप करून त्यावर दर आठवड्याला एक गोष्ट व एक कोडं पाठवलं जात आहे. विद्यार्थी त्यावर प्रतिसाद देतात, त्यांनी सोडविलेली कोडी पाठवितात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गणित व भाषा हे दोन विषय विद्यार्थ्यांचे एकूण शैक्षणिक आकलन ठरवितात. त्यामुळे या परिस्थितीत गणित व भाषिककौशल्यावर भर दिला, तर त्याचा त्यांना कायमचा उपयोग होऊ शकतो. गोष्ट सगळ्यांना आवडते. दर आठवड्याला पाठविली जाणारी सचित्र गोष्ट मुलांचं विचारविश्व कसं विस्तारेल, याचा विचार करून दिली जात आहे. प्राथमिक शाळेतील मुलांना आपण परिकथा, प्राण्यांच्या गोष्टी सांगतो, त्या त्यांना आवडतात. पण, इयत्ता पाचवीच्या पुढच्या मुलांचा वास्तवाशी परिचय व्हायला सुरुवात झालेली असते, त्यांना साहस आवडतं, वास्तववादी गोष्ट त्यांना समजते. त्यांच्यासाठी आम्ही अंटार्क्टिकाच्या शोधाची मोहीम, इतिहासातील व विज्ञानातील शोधांच्या कथा, अशा अनेक परिघापलीकडच्या गोष्टी सचित्र मांडायचा प्रयत्न करत आहोत. यातून मुलांना जग समजून घेण्याची इच्छा तयार होईल व त्यांचं वाचनाबद्दलचं आकर्षण टिकून राहील. अभ्यासक्रमाबद्दल नाही, तर अभ्यासाबद्दल कुतूहल तयार होईल. मुलं मोठी व्हायला लागतात तसं त्यांचं भावविश्व बदलतं, आकलन बदलतं. या वयात अशा फॅसिनेटिंग गोष्टी कळल्या, तर वाचनाची आवड तयार होते. यासाठी गोष्टी सचित्र असाव्यात; पण ॲनिमेशनचा अतिरेक नको. सचित्रतेत नकाशा दाखविता येतो. तत्कालीन चित्र दिसतात; पण कुतूहल तयार होतं; मात्र कल्पनाशक्ती स्वत:ची वापरावी लागते.

गणितातील कोडीही मुलांना सोडवायला तितकीच आवडतात. आम्ही घातलेलं एक कोडं होतं कागदाच्या घड्यांबद्दलचं. कोणताही आयताकृती कागद घेतला व त्याच्या चार समान घड्या करायच्या असल्यास त्या किती प्रकारे करता येतील, १६ समान घड्या करायच्या असल्यास कागदाला कमीत कमी किती घड्या कराव्या लागतील... अशा अनेक गोष्टी मुलं सध्या करत आहेत. त्यांचे प्रतिसाद पाठवत आहेत. आपला विद्यार्थी अथवा शाळा मंथन रिसोर्सेसच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. आशयनिर्मिती, चित्रीकरण, व्हिडिओ एडिटिंग यासाठी खर्च येतो. आम्ही आर्थिक मदतीसाठी सामाजिक आवाहनही करत आहोत. सध्या मुलं शिक्षणाला जोडली जाण्याची गरज लक्षात घेता, मराठी माध्यमाच्या शाळांसाठी नाममात्र शुल्कात हा उपक्रम चालवत आहोत. यासाठी संपर्क साधा - manthanresources@gmail.com;  8999369222

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com