रेल्वेत तब्बल 2 लाख पदं रिक्त; कुठल्या झोनमध्ये किती आहेत जागा पाहा

Railway Recruitment 2022
Railway Recruitment 2022esakal
Summary

विविध झोनमध्ये रिक्त असलेल्या राजपत्रित आणि अराजपत्रित पदांची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहाला दिली.

Railway Recruitment : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी काल राज्यसभेत सांगितलं की, रेल्वेच्या विविध विभागांत 2,65,547 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 2,177 राजपत्रित आणि 2,63,370 अराजपत्रित पदं आहेत. माकपचे खासदार डॉ. व्ही. शिवासदन (Dr. V. Shiva Sadana) यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिलीय. विविध झोनमध्ये रिक्त असलेल्या राजपत्रित आणि अराजपत्रित पदांची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहाला नुकतीच दिली.

रेल्वे मंत्री म्हणाले, मध्य रेल्वेत 56 राजपत्रित (Gazetted) आणि 27177 अराजपत्रित (Non-Gazetted) पदे रिक्त आहेत. तर ईस्ट कोस्ट रेल्वेमध्ये 87 राजपत्रित आणि 8477 अराजपत्रित पदे रिक्त आहेत. शिवाय, पूर्व मध्य रेल्वेत 170 राजपत्रित आणि 15268 अराजपत्रित पदं रिक्त आहेत. पूर्व रेल्वेमध्ये 195 राजपत्रित आणि 28204 अराजपत्रित पदं, तर मेट्रो रेल्वेत 22 राजपत्रित आणि 856 अराजपत्रित पदं रिक्त असल्याचं त्यांनी सांगितलं.

Railway Recruitment 2022
'Asaduddin Owaisi 'राष्ट्रवादी' नसले, तरी 'देशभक्त' आहेत'

रिक्त जागांचा तपशील

  • उत्तर मध्य रेल्वे - 141 राजपत्रित, 19366 अराजपत्रित

  • ईशान्य रेल्वे - 62 राजपत्रित, 14231 अराजपत्रित

  • नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे - 112 राजपत्रित, 15677 अराजपत्रित

  • उत्तर रेल्वे - 115 राजपत्रित, 37436 अराजपत्रित

  • उत्तर पश्चिम रेल्वे - 100 राजपत्रित, 15049 अराजपत्रित

  • दक्षिण मध्य रेल्वे - 43 राजपत्रित, 16741 अराजपत्रित

  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे - 88 राजपत्रित, 9422 अराजपत्रित

  • दक्षिण पूर्व रेल्वे - 137 राजपत्रित, 16847 अराजपत्रित

  • दक्षिण रेल्वे - 161 राजपत्रित, 19500 अराजपत्रित

  • दक्षिण पश्चिम रेल्वे - 65 राजपत्रित, 6525 अराजपत्रित

  • पश्चिम मध्य रेल्वे - 59 राजपत्रित, 11073 अराजपत्रित

  • पश्चिम रेल्वे - 172 राजपत्रित, 26227 अराजपत्रित

Railway Recruitment 2022
Udayanraje Bhosale राष्ट्रवादीत परत जाणार? राजेंनी स्पष्ट केली भूमिका

रेल्वेमंत्री पुढे म्हणाले, इतर युनिटमध्ये 507 राजपत्रित आणि 12760 अराजपत्रित पदं रिक्त आहेत. ती पदं निर्माण करणं आणि भरणं ही सतत प्रक्रिया सुरुय. मात्र, कोरोना महामारी आणि विविध राज्यांनी लादलेल्या लॉकडाउनमुळं परीक्षेच्या प्रक्रियेवर परिणाम झालाय. देशात कोविडची (Coronavirus) पहिली लाट संपल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर RRB नं 15 डिसेंबर 2020 पासून टप्प्याटप्प्यानं रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलीय. गेल्या पाच वर्षांत रेल्वे भरती बोर्डानं 1,89,790 लोकांची नियुक्ती केलीय, असं त्यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com