मॅनेजमेंट स्किलिंग : संवादाचे महत्त्व

कम्युनिकेशन स्किल्स हा विषय इंजिनिअरिंग महाविद्यालयात अभ्यासक्रमात असतो. आपण त्या विषयाकडे दुर्लक्ष करतो.
Communication
CommunicationSakal
Summary

कम्युनिकेशन स्किल्स हा विषय इंजिनिअरिंग महाविद्यालयात अभ्यासक्रमात असतो. आपण त्या विषयाकडे दुर्लक्ष करतो.

कम्युनिकेशन स्किल्स हा विषय इंजिनिअरिंग महाविद्यालयात अभ्यासक्रमात असतो. आपण त्या विषयाकडे दुर्लक्ष करतो. व्यावसायिक अनुभवी होत जातो तसं त्याच्या काही कौशल्यात सातत्याने सुधारणा व्हायला हवी आणि त्यात संवाद कौशल्याला अग्रक्रम द्यावा लागेल. रूढार्थाने व्यवसायात दोन प्रकारचे संवाद साधले जातात. एक म्हणजे औपचारिक संभाषण (फॉर्मल कम्युनिकेशन) आणि दुसरं म्हणजे अनौपचारिक संभाषण. (इनफॉर्मल कम्युनिकेशन). दोन्ही प्रकारचे संभाषण आस्थापनेत होत असले तरी आपण फक्त औपचारिक संभाषण कौशल्याबद्दल बोलणार आहोत. कुठल्याही आस्थापनेत खालील पद्धतीचे संभाषण घडणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे.

१. मौखिक संभाषण (व्हर्बल कम्युनिकेशन) : कामाच्या ठिकाणी सर्वाधिक संवाद/संभाषण कुठल्या पद्धतीने घडत असतील तर ते म्हणजे मौखिक संभाषण. प्रत्यक्ष समोरासमोर, फोनद्वारे किंवा आजकाल प्रसिद्ध झालेल्या ऑनलाइन मिटिंगमध्ये मौखिक संभाषणाचा वापर आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यासाठी केला जातो. या प्रकारचा संवाद साधताना आवाजाचा पोत, त्याची लय, वेग या सगळ्यांचं महत्त्व आपापल्या जागी आहे.

२. अ-मौखिक संभाषण : संवाद साधताना नेहमीच शब्दांची गरज लागतेच असं नाही. मौखिक संभाषण करताना आपल्या चेहऱ्याचे हावभाव, नजरेतील बदल, शरीराच्या विविध अवयवांचा जसे की हात याचा वापर याद्वारेही आपल्याला व्यक्त करायचं आहे ते परिणामकारकरीत्या करू शकतो. ग्रुप मीटिंग घेतली जाते तेव्हा या संवाद कौशल्याचा वापर योग्य पद्धतीने केल्यास अपेक्षित परिणाम मिळवू शकतो.

३. लिखित संवाद/संभाषण (रिटन कम्युनिकेशन) : आस्थापनेत कुठल्या संवाद माध्यमाला प्रमाण मानत असतील तर ते म्हणजे लिखित संभाषण. तिथे वापरल्या जाणाऱ्या कार्यालयीन दस्तऐवजात लिखित संभाषण वापरले जाते. आस्थापनेतील वेगवेगळ्या विभागात जाणारे ई-मेल्स, अपॉइंटमेंट लेटर्स, पर्चेस ऑर्डर्स या सगळ्यांमध्ये ‘रिटन कम्युनिकेशन’चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

४. दृश्यमान संभाषण (व्हिज्युअल कम्युनिकेशन) : आजकल प्रसिद्ध झालेले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन हे या प्रकारचं समर्पक उदाहरण आहे. असं म्हटलं जातं की एखादा संदेश हजारो शब्दांनी पोचवला जात नसेल, पण एखाद्या चित्राने तो परिणामकारकरीत्या पोहोचू शकतो.

५. काळजीपूर्वक ऐकणे (लिसनिंग) : संभाषणात अनेकदा आपण जे बोलतो तिथपर्यंत हे कौशल्य मर्यादित केलं जातं पण आपण जितक्या काळजीपूर्वक आपण ऐकतो त्यावर अनेक रिझल्ट्स अवलंबून असतात.

व्यावसायिक जगात वरील संवादकौशल्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यात परत मेख अशी आहे की, वरील पाचपैकी फक्त एकाच प्रकारचं कौशल्य अंगात असून चालत नाही तर या सर्व प्रकारच्या संवाद पद्धतीत जितकं आपण प्रभुत्व मिळवू तितकं लीडर म्हणून स्वीकारले जातो. या संवाद कौशल्याला तर्कशास्त्र आणि संख्याशास्त्राची त्याच्याबरोबर जे मांडलं जातं त्याला कृतिशीलतेची जोड दिली तर लीडरबद्दलची विश्वासार्हता वाढीला लागते आणि त्यायोगे हे सार्वत्रिक व्यवसाय वृद्धीसाठी पूरक असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com