मॅनेजमेंट स्किलिंग : कौशल्यांचा अंगीकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Management Skilling

गेले तीन महिने व्यवस्थापकीय कौशल्य (मॅनेजमेंट स्किलिंग) या विषयावर एकंदरीत बारा लेख लिहिले.

मॅनेजमेंट स्किलिंग : कौशल्यांचा अंगीकार

गेले तीन महिने व्यवस्थापकीय कौशल्य (मॅनेजमेंट स्किलिंग) या विषयावर एकंदरीत बारा लेख लिहिले. त्यात आपण मूळ सिद्धांत आणि उद्देश याचं महत्त्व, डेलिगेशन, टाइम मॅनेजमेंट, व्यावसायिक आणि उद्योजकता यातील फरक, वृद्धिधिष्ठित मानसिकता, निर्णयक्षमता, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा, SWOT विश्लेषण अशा विविध विषयावर माझी मतं मांडण्याचा प्रयत्न केला. कुठलाही व्यावसायिक अथवा व्यवस्थापकाने ही कौशल्य अंगी आत्मसात केल्यास शाश्वत व्यवसाय उभा होण्यासाठी मदत होईल असं मला वाटतं. 

याशिवाय व्यवसायाच्या प्रत्येक विभागासंदर्भात काही विशेष कौशल्य आहेत. जसं काही पर्चेस विभागाकडे निगोशिएशन स्किल्स (वाटाघाटी करण्याचं कौशल्य) किंवा मनुष्य बळ विभागाकडे इंटरपर्सनल रिलेशन्स हे कौशल्य असणं ही गरज असते. असे विभागानुरूप अनेक कौशल्य आपल्याला नमूद करता येतील.

एक मात्र लक्षात आलं आहे की ही अनेक कौशल्य आत्मसात करता करता एका क्षणी हे कळतं की एका मर्यादेनंतर सरतेशेवटी हे मॅन मॅनेजमेंट (मनुष्य बळ व्यवस्थापन) आणि फायनान्स मॅनेजमेंट (आर्थिक व्यवस्थापन) इथं येऊन थांबतं. व्यवस्थापनाची शिडी चढत असताना किंवा व्यावसायिक म्हणून स्वतःला प्रस्थापित करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे मोठं जबाबदारीचं आणि जोखमीचं काम आहे. ती जबाबदारी अंगावर घेताना जितकी कौशल्य आपण आत्मसात करू तितकं एक लीडर म्हणून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि त्यानेच यशस्वितेची शक्यता वाढत जाते.

हा समारोपाचा लेख लिहिताना इतकंच सांगू शकतो की ही लेखमाला संपत असली तरी ही कुणाची व्यवस्थापनाची एक सुरुवात असू शकते. किंबहुना ती असावी अशी माझी आंतरिक इच्छा आहे. तथाकथित भांडवलशाही ही आपल्या कर्मचाऱ्यांना पिळून घेणारी व्यवस्था आहे असा एक समज आहे. त्याला गैर ठरवायचं असेल, त्या समजुतीला छेद द्यायचा असेल तर लोकाभिमुख, मूल्याधिष्ठित, नैतिक अशा व्यवस्थापन पद्धतीचा वापर व्यवसायात व्हायला हवा. नवीन आर्थिक वर्ष उद्यापासून सुरू होतं आहे. त्यासाठी सर्वाना हार्दिक शुभेच्छा.

(समाप्त)

Web Title: Rajesh Mandlik Writes Management Skilling Pjp78

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationjobSkills