करिअरच्या वाटेवर : क्वालिटी इंजिनिअर : गुणवत्ता व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक

नवनवीन तंत्रज्ञानामुळे प्रत्येक ठिकाणी गुणवत्तेचा निकष अतिशय गांभीर्याने हाताळला जात आहे.
Quality Engineer
Quality EngineerSakal
Summary

नवनवीन तंत्रज्ञानामुळे प्रत्येक ठिकाणी गुणवत्तेचा निकष अतिशय गांभीर्याने हाताळला जात आहे.

- राजेश ओहोळ

नवनवीन तंत्रज्ञानामुळे प्रत्येक ठिकाणी गुणवत्तेचा निकष अतिशय गांभीर्याने हाताळला जात आहे. साहजिकच, सर्व उद्योगांना स्पर्धेत टिकण्याकरिता गुणवत्तेशी मैत्री करणे भाग पडले आहे. अभियांत्रिकी प्रक्रियेतून उत्पादित झालेल्या वस्तूची गुणवत्ता पडताळणी पद्धती व गुणवत्ता नियंत्रण साधने ही उत्पादित वस्तूच्या अचूकतेनुसार निवडली जातात.

अभियांत्रिकीतील उत्पादित वस्तूंचे मोजमाप शास्त्र म्हणजे ‘मेट्रोलॉजी’ होय. उत्पादित झालेली अंतिम वस्तू ठरलेल्या मोजमापात मोडते की नाही याचा निर्णय ‘गेजिंग’मध्ये होतो. मोठ्या संख्येत उत्पादित झालेल्या वस्तूंची गुणवत्ता ठरविण्याकरिता गेजिंगचा वापर होतो. तेव्हा मेट्रोलॉजीमध्ये गेजिंग हे गुणवत्ता नियंत्रणाचे प्रमुख प्रभावी अस्त्रांपैकी एक समजले आहे.

अभियांत्रिकीच्या सुट्या घटकांची अथवा अंतिम ॲसेंबलीची गुणवत्ता उत्पादन करणाऱ्या मशिनच्या अचूकतेवर ठरते. यंत्र अभियांत्रिकीमध्ये उच्चतम अचूकता देणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनचा सातत्याने विकास होत आहे. उच्चतम अचूकता असणाऱ्या घटकांची, सुट्या भागांची अथवा अंतिम ॲसेंबलीची गुणवत्ता नियंत्रण साधनेही अधिकाधिक संवेदनशील व तुल्यबळ अचूकतेची विकसित झालेली आहेत.उच्च अचूकता निर्माण करणाऱ्या मशिनची अचूकता पडताळणी हेही काम विशेष बनले आहे. मशिनच्या अचूकतेचे मूल्यांकन वेळोवेळी करावे लागते. कारण कुठल्याही स्वरूपाचे उत्पादन बाद होऊ न देण्याचा प्रत्येक उद्योजक काळजी घेत असतो.

अभियांत्रिकी वस्तूची एकसारख्या अचूकतेची जोपासना ही गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीवर अवलंबून राहते. गुणवत्ता व्यवस्थापनात क्वालिटी इंजिनिअर अंतिम वस्तू, घटक किंवा ॲसेबली प्रमाणिक करतो. अभियांत्रिकीच्या सर्व छोटे मोठे उद्योग, कारखाने, प्रकल्प यामध्ये क्वालिटी इंजिनिअर हे पद हमखास पहावयास मिळते.

मेकॅनिकल, प्रॉडक्शन आणि इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग शाखांच्या पदवी अथवा पदविकाधारकांना क्वालिटी इंजिनिअर म्हणून खासगी यंत्र अभियांत्रिकी उद्योग, कंपनी अथवा मोठ्या प्रकल्पांमध्ये नोकरी मिळविता येते. मेट्रोलॉजीमध्ये मोडणाऱ्या सर्व मोजमाप साधनांचे राष्ट्रीय प्राधिकृत प्रयोगशाळांकडून किंवा त्यांनी परवानगी दिलेल्या माध्यमांकडून कॅलिब्रेशन वेळोवेळी करावे लागते. कॅलिब्रेशन प्रक्रियेशी क्वालिटी इंजिनिअरचा थेट संबंध येतो. कॅलिब्रेशन निष्णात इंजिनिअर हादेखील गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचा महत्त्वाचा घटक असतो.

क्वालिटी इंजिनिअर म्हणून मिळविलेला अनुभव उमेदवाराला डिझाईन आणि उत्पादन यातील ताळमेळ कसा असतो, हे शिकवितो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com