परदेशात शिकताना : संधी कॉस्मेटिक इंडस्ट्रीमधील...

सुंगधी द्रव्यांचा उद्योग जगभरात मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यातून दरवर्षी ३०० नव्या अत्तरांची निर्मिती केली जाते. यातून अनेक मार्केटिंग कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धाही तयार निर्माण झाली आहे.
beauty products
beauty productssakal

जगातील सर्व सुंदर गोष्टी आपल्या आनंदामध्ये भर टाकतात आणि खरेतर याच मूळ आधारावर जग फिरत असते. सौंदर्य अनेक छोट्या छोट्या संकल्पनांमध्ये असते या प्रत्येकातून एक नवी संकल्पना जन्माला येते आणि अभ्यास आणि संशोधनाची अज्ञात क्षेत्रे खुली होता. कॉस्मेटिक सायन्स (सौंदर्य शास्त्र) आता केवळ बाहेरच्या पतलावर फिरणारे शास्त्र राहिलेले नसून, मानवाच्या भल्यासाठी खूप आतपर्यंत पोचलेले शास्त्र बनले आहे. या क्षेत्रामध्ये खूप वरच्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू असून, त्यामध्ये अत्यंत अद्ययावत अशा तंत्रज्ञानाचा वापरही केला जातो आहे. त्यामुळेच हे क्षेत्र खूपच रोमांचक बनले आहे व त्याचबरोबर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धाही आली आहे.

सुंगधी द्रव्यांचा उद्योग जगभरात मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यातून दरवर्षी ३०० नव्या अत्तरांची निर्मिती केली जाते. यातून अनेक मार्केटिंग कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धाही तयार निर्माण झाली आहे. या कंपन्या ग्राहकांच्या वैयक्तिक निवडीपेक्षा लिंग, वय व पगार या आधीच निश्‍चित केलेल्या निकषांच्या आधारे या गटांवर मार्केटिंगसाठी लक्ष केंद्रित करतात. कॉस्मेटिक सायन्समध्ये अत्यंत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होत असून, त्या आधारे वापरकर्ता कोणता पर्फ्युम वापरणार आहे याचे विश्‍लेषण जनुकीय आराखड्याच्या मदतीने केले जाते. यासाठी ११५ जणांच्या जनुकांच्या जोड्यांच्या मेजर हिस्टोकॉम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्सचा (एमएचसी) आधार घेण्यात आला आहे. या पाहणीचा उद्देश एमएचसीच्या समान जोड्या असणारे लोकांच्या पर्फ्युम खरेदी करण्याच्या सवयी नक्की कशाप्रकारे असतात आणि ते एकाच प्रकारेच पर्फ्युम खरेदी करतात का, हे पाहण्याचा आहे. यातून आपल्याला दिसते, की हे क्षेत्र नव्याने करिअर करू पाहणाऱ्या फार्मासिस्ट आणि कॉस्मेटिक सायंटिस्टना अनेक मोठ्या संधी मिळवून देत आहे.

एसएस इन कॉस्मेटिक सायन्स हे तुलनेने अत्यंत नवे क्षेत्र असून, ते कॉस्मेटिक्स, टॉयलेटरिज आणि फ्रेगनन्स इंडस्ट्रीमध्ये अनेक उत्पादने घेणाऱ्या कंपन्यांना मदत करतात. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना या क्षेत्रातील अनेक नवनवीन संशोधनांबद्दल माहिती दिली जाते. यातून विद्यार्थ्यांना या क्षेत्रासाठी आवश्‍यक असलेली नैपुण्ये आत्मसात करण्याची व थेट या क्षेत्रात संशोधन करीत असलेल्या वरिष्ठांबरोबर काम करण्याची संधीही मिळते. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कॉस्मेटिक इंडस्ट्रीमधील मोठ्या पगाराच्या नोकऱ्या, तसेच संशोधनाचे काम करण्याची संधी मिळू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com