esakal | परदेशात शिकताना... : कॉम्प्युटर सायन्सचा मोठा आवाका...
sakal

बोलून बातमी शोधा

Computer Science

परदेशात शिकताना... : कॉम्प्युटर सायन्सचा मोठा आवाका...

sakal_logo
By
राजीव बोस

जगातील सर्वाधिक मागणी असलेले आणि ट्रेंडमध्ये असलेले क्षेत्र कॉम्प्युटर सायन्स आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. जगभरात या क्षेत्रातील नैपूण्यप्राप्त आणि कार्यतत्पर व्यावसायिकांची गरज मोठ्या प्रमाणावर भासत असल्याचे आपल्याला दिसून येते. या क्षेत्राची सर्वसामान्य ओळख सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा आयटी मॅनेजमेंट अशीच असली, तरी त्यात अनेक स्पेशलायझेशन्स मिळवता येतात, हे या क्षेत्रात काम करणाऱ्यांना नक्कीच माहिती आहे. या क्षेत्रामध्ये २५ विविध स्पेशलायझेशन निवडता येतात, ज्यामध्ये अॅडव्हान्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मशिन लर्निंग आणि अर्टिफिशिअल इंटेलिजन्स, कॉम्प्युटर नेटवर्क्स, सायबर सिक्युरिटी या सर्वज्ञात क्षेत्रांबरोबरच काहीशा क्लिष्ट अशा मोबाईल डिव्हाईस प्रोग्रॅमिंग, एन्टरप्राईज आर्किटेक्चर, कम्पायलर कन्स्ट्रक्शन व अशाच अनेक क्षेत्रांचाही समावेश होतो. या सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा विचार करता विपुल संधी आहेतच, त्याचबरोबर वार्षिक उत्पन्नाचा विचार करता ही क्षेत्रे खूपच फायद्याचीही आहेत.

सॉफ्टवेअर कंपनीत मोठ्या संधी

कॉम्प्युटर सायन्स या शाखेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे, तुम्ही मेकॅनिकनल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधील पदवी मिळवलीत किंवा मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटेस्टिक्सचा समावेश असलेली कोणतीही पदवी घेतलीत व त्यानंतर सॉफ्टवेअर अभ्यासक्रमाचा कोणताही सर्टिफिकेट कोर्स किंवा डिप्लोमा केल्यास तुम्ही या क्षेत्रातील ‘एमएस’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरता. यात काही शंका नाही, की तुम्हाला याच क्षेत्रात काम केलेल्या किंवा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांशी मोठी स्पर्धा करावी लागेल, मात्र तुम्हाला संधी नक्कीच मिळेल! आम्हाला कायमच असे दिसून येते, की मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदवी घेतलेले विद्यार्थी सॉफ्टवेअरचे चांगले ज्ञान मिळवतात आणि बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या पदावरील जागा पटकावतात. अमेरिकेतील शिक्षण पद्धती अत्यंत लवचिक असून, विविध विद्याशाखांतील विद्यार्थी त्यांना करिअर करण्याची इच्छा असलेला कोणताही अॅडव्हान्स अभ्यासक्रम निवडू शकतात.