esakal | परदेशात शिकताना... : स्थापत्य अभियांत्रिकीतून नवनिर्माणाच्या संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Abroad Education

परदेशात शिकताना... : स्थापत्य अभियांत्रिकीतून नवनिर्माणाच्या संधी

sakal_logo
By
प्रशांत पाटील

संपूर्ण जग नवनिर्माणाच्या दिशेने पुढे जात असताना स्थापत्य अभियांत्रिकी ही सर्वांत जुनी व मूलभूत शाखा नव्या जगाची आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. या शाखेने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही मोठी प्रगती केली आहे. स्थापत्य अभियंते आता गुंतागुंतीच्या गणिती सूत्रांच्या आधारे कोणत्याही इमारतीची आराखडा ठरवण्याचे व त्याची व्यवहार्यता तपासण्याचे काम करीत आहेत. नियोजन, समन्वय व प्रक्रियांवरील नियंत्रणावरच कोणत्याही प्रकल्पाचे यशापयश अवलंबून असते. त्याचबरोबर अभियंत्यांच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प साधा असेल की अद्वितीय, हेही ठरत असते. या ध्येयाने प्रेरित होऊन भारतातील अनेक स्थापत्य अभियंत्यांनी अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. आम्ही गेल्या काही वर्षांत स्थापत्य अभियंत्यांचा अमेरिकेत शिक्षणसाठी जाण्याचा ओढा पाहून सर्वाधिक मागणी असलेल्या क्षेत्रांचा मागोवा घेतला. पदवीधारकांना त्यांचा ज्ञानाचा सर्वाधिक वापर कोठे करता येतो आणि कोठे नोकरीच्या सर्वाधिक संधी आहेत, हेही तपासले.

सर्वाधिक मागणी असलेली क्षेत्रे

  • कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग आणि व्यवस्थापन

  • एन्व्हायरोन्मेंटल अॅण्ड वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग

  • जिओटेक्निकल इंजिनिअरिंग

  • स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग अॅण्ड मटेरिअल्स

  • ट्रान्स्पोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड सिस्टिम इंजिनिअरिंग

  • सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग

आजकाल स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्राबरोबरच आर्किटेक्चरचे विद्यार्थीही कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट या क्षेत्रात रस घेऊ लागले आहेत. कन्स्ट्रक्शन प्लॅनिंगमधील अत्याधुनिक कौशल्ये आत्मसात केलेल्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. बीआयएम, अॅडव्हान्सड व्हिज्युअलाझेशन अॅण्ड सिम्युलेशन सिस्टिम, एन्व्हायोरन्मेंट अॅण्ड सस्टेनिबिलिटी अॅण्ड ग्रीन बिल्डिंग प्रॅक्टिसेस या अभ्यासक्रमांच्या जोडीला फिजिबिलिटी अॅनालिसिस आणि रिस्क मॅनेजमेंटचे विशेष नैपुण्य आपल्या पदवी अभ्यासक्रमात प्राप्त केलेल्या युवा स्थापत्य अभियंत्यांना नोकरीच्या सर्वाधिक संधी उपलब्ध असल्याचे दिसून येते.

loading image
go to top