परदेशात शिकताना : पॅकेजिंग इंडस्ट्रीत मोठ्या संधी

आपण परदेशात शिक्षणाच्या विविध संधी आणि करिअरविषयी माहिती घेत आहेत. आज आपण पॅकेजिंग इंडस्ट्रीबद्दल माहिती घेऊयात.
packaging Industry
packaging IndustrySakal

आपण परदेशात शिक्षणाच्या विविध संधी आणि करिअरविषयी माहिती घेत आहेत. आज आपण पॅकेजिंग इंडस्ट्रीबद्दल माहिती घेऊयात. पॅकेजिंग इंडस्ट्रीच्या प्रगतीमुळे जगात खोलवर जाऊन ज्ञान घेण्यासाठीच्या एका नव्या शाखेचाच उदय झाला आहे. या शतकाचे वैशिष्ट्य प्रक्रिया करून पॅक केलेले अन्न, हेच आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपल्याला अन्न साठवून ठेवणे सहजसाध्य झाले आहे, जे पूर्वी अशक्य होते. पॅकेजिंग इंडस्ट्रीमुळे काही महिन्यांपूर्वी तयार केलेले अन्नही लोकांना त्यातील पौष्टिक मूल्यांचा ऱ्हास न होता खाणे शक्य होत आहे. हे अत्यंत स्वच्छ व जिवाणूरहित पॅकेजिंगमुळेच साध्य करता येते. या क्षेत्रातील तज्ज्ञ पुढील दहा वर्षे डेअरी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे सांगतात.

पदार्थ भरताना पाळल्या जात असलेल्या स्वच्छतेमुळे अन्न पदार्थांची निर्मिती करणाऱ्या जागतिक कंपन्यांना आपला व्यवसाय नव्या तयार होत असलेल्या बाजारपेठांमध्ये पाठवणे शक्य होत आहे. भारत डेअरी उत्पादनांचा दररोजच्या जेवणात वापर करणारा जगातील सर्वांत मोठा देश असून, त्याचबरोबर विविध भाज्या व मांसासारख्या रेडी टू कुक पदार्थांचीही मोठी बाजारपेठ आहे. हे पदार्थ अगदी सहज बनवून खात येतात हा फायदा असून, त्यामुळेच त्याला मोठी बाजारपेठ मिळत आहे. त्याबरोबर सध्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात कोणालाही अन्न वाया घालवणे परवडणारे नसून, तो अपराधच ठरेल. जिवाणूरहित प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग या तंत्रज्ञानाला विविध कंपन्यांनी अन्नाच्या नासाडीविरोधात युद्ध पुकारल्यामुळे मोठे महत्त्व आले आहे.

यामुळे पॅकेजिंग इंडस्ट्रीमधील तज्ज्ञांसाठी मोठी संधींची द्वारे खुली झाली आहेत. त्यासाठी या विषयाचे सखोल ज्ञान व त्याचबरोबर विविधांगी संशोधनाचीही गरज भासते. यामध्ये तंत्रज्ञानाबरोबरच फूड सायन्सचे ज्ञानही असणे अनिवार्य ठरते. अमेरिकेतील अनेक विख्यात विद्यापीठे या क्षेत्रातील मास्टर्स डिग्रीसाठी अभ्यासक्रम चालवतात. यासाठी शैक्षणिक पात्रता इतर अभ्यासक्रमांप्रमाणेच, या क्षेत्रातील चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम. जीआरई व ‘टोफेल’मधील मार्क हाच आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अत्यंत चांगले करिअर व पगार मिळण्याची शाश्वती मिळतेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com