esakal | परदेशात शिकताना... : पीएचडी की एमएस-पीएचडी...
sakal

बोलून बातमी शोधा

Abroad Education

परदेशात शिकताना... : पीएचडी की एमएस-पीएचडी...

sakal_logo
By
राजीव बोस

अमेरिकेतील नामांतिक विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश मिळवणे महाकठीण काम ठरते. खरेतर, तेथील बहुतांश मान्यताप्राप्त विद्यापीठांकडे संशोधनाच्या सुविधा विपुल प्रमाणात उपलब्ध असतात, मात्र विद्यार्थ्याला ज्या विषयात काम करायचे आहे, त्यासाठी निधी उपलब्ध आहे की नाही, हा खूप महत्त्वाचा प्रश्न ठरतो.

पीएचडी प्रवेशासाठी अर्ज करणे ही खूप लांबलचक प्रक्रिया असते. यामध्ये अनेक पायऱ्यांचा समावेश असतो आणि संबंधित विविध लोकांशी अनेक प्रकारचा पत्रव्यवहार करणे क्रमप्राप्त असते. विद्यार्थ्याने आवश्यक असलेला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तो डॉक्टरेटसाठीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतो, त्याचीसाठीचे त्याचे ध्येय आणि स्पेशलायझेशन तयार असावे लागते. त्यामुळे प्रवेशासाठी अर्ज करण्यापूर्वीच त्याने संशोधनासाठीचा प्रस्ताव तयार ठेवणे गरजेचे असते.

त्यासाठी विविध विद्यापीठांतील या विषयातील संशोधनाची यादी तयार करणे व संबंधितांशी संपर्क साधणे सर्वांत महत्त्वाची पायरी ठरते. असे न केल्यास संबंधित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला या संशोधनामध्ये फारसा रस नसल्याचा निष्कर्ष काढून त्यांना प्रवेशापासून दूर केले जाऊ शकते. संबंधित प्रकल्पाचे प्राध्यापक मंडळ तांत्रिक लेखनात (टेक्निकल रायटिंग) कुशल आणि परिणामकारक असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देतात. याचाच अर्थ विद्यार्थ्याकडे प्रकल्प लेखनाचे अद्ययावत ज्ञान व त्याचबरोबर बोलण्याचे कौशल्य असणे आवश्यक ठरते.

अनेकदा असे घडते, की जो विद्यार्थी स्वतंत्रपणे रिसर्च प्रोग्रॅमसाठी अर्ज करीत असतो, त्याच्याऐवजी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याची संशोधनासाठी निवड केली जाते. याचे कारण पदव्युत्तर शिक्षण (एसएस) घेणाऱ्या विद्यार्थ्याने प्राध्यापकांशी असलेल्या दररोजच्या संपर्कातून त्याचे कौशल्य सिद्ध केलेले असते. थेट डॉक्टरेटसाठी अर्ज करताना येणाऱ्या या मर्यादा लक्षात घेता एमएस-पीएचडी अशी दुहेरी पदवी घ्यायला प्राधान्य दिले जाते.

अमेरिका आणि पदवीधारकांची संख्या

जगभरातून अमेरिकेत येऊन पदवी आणि त्यापुढील शिक्षण घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये वाढच होताना दिसत आहे. चांगल्या पायाभूत सुविधा, मान्यताप्राप्त विद्यापीठे, शिक्षणासाठीचा भरघोस निधी व नोकरीच्या संधी यामुळे अमेरिकेत शिक्षण घेण्याकडे जगभरातील विद्यार्थ्यांचा कल दिसतो.

loading image