esakal | परदेशात शिकताना... : चलती ‘इंटरनेट ऑफ थिंग्जची’
sakal

बोलून बातमी शोधा

Abroad Education

परदेशात शिकताना... : चलती ‘इंटरनेट ऑफ थिंग्जची’

sakal_logo
By
राजीव बोस

तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती होत असून, ती वेगाने पसरतेही आहे व त्याचा परिणाम लोकांच्या एकमेकांशी असलेल्या संपर्काचा, एकत्र येण्याचा दर्जा मोठ्या प्रमाणात सुधारण्यामध्ये दिसून येतो. त्यामुळे संपूर्ण जगच ‘स्मार्ट सिटी’ बनत असून, ते ‘ग्लोबल व्हिलेज’ बनण्याची प्रक्रिया सातत्याने व वेगाने सुरू आहे. आपल्याला ‘5 जी’ तंत्रज्ञानातील विविध संशोधने बाहेर येताना दिसत असून, त्यामुळे सध्याच्या नेटवर्कची क्षमता शेकडो पटीने वाढणार असून, त्यातून अद्ययावत अशा ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ किंवा ‘आयओटी’ या तंत्रज्ञानची भर पडते आहे. या अमर्याद कनेक्टिव्हिटीतून एक सर्वांत महत्त्वाची गोष्ट निर्माण होणार आहे आणि ती म्हणजे ‘डेटा’. यातूनच आपण अनेक प्रकारची वापरण्यायोग्य आणि व्हर्च्युअल उपकरणांची निर्मिती होताना पाहात आहोत. त्यातून ग्राहकोपयोगी सेवा पुरवणे व या सेवेतूनची डेटाचा निर्मिती करणे कंपन्यांना शक्य होते आहे. त्याचबरोबर त्याचा उपयोग या कंपन्यांना त्यांची धोरणे ठरविण्यासाठी व ग्राहकांच्या खरेदीचा कल ओळखण्यासाठीही होतो आहे. त्याबरोबर सध्याच्या कोरोना महामारीच्या स्थितीमध्ये सर्वांना इंटरनेट तंत्रज्ञान आणि नेटवर्क वापरणे अनिवार्य झाले आहे, अनेक उद्योगांना त्यांची कार्यपद्धती बदलणेही अनिवार्य झाले असून, या परिस्थितीत त्यांचा डेटा कसा सुरक्षित राहील हे सुनिश्चित करणेही क्रमप्राप्त झाले आहे.

कॉम्प्युटर नेटवर्क आणि संधी

आपल्या सर्वांच्याच कामाच्या पद्धतीतच बदल झाल्याने त्यासाठी आवश्यक असलेले गुंतागुतींच्या जाळ्याचे व्यवस्थापन करणे आणि तयार झालेल्या प्रचंड डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी गरज आवश्यक बनली आहे. त्यामुळे या साठी आवश्यक असलेले ज्ञान प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांना प्रचंड प्रमाणातील डेटाचे संरक्षण व व्यवस्थापन करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्याचबरोबर डेटाचा वापर करणाऱ्या सर्व प्रकारच्या गॅजेट्सची सुरक्षाव्यवस्था सांभाळण्याचे कामही करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना कॉम्प्युटर सायन्समधील ‘एमएस’ ही पदवी कॉम्प्युटर नेटवर्कमधील स्पेशलायझेशनसह मिळविणे आवश्यक आहे. अमेरिकेतील अनेक मान्यताप्राप्त विद्यापीठे या क्षेत्रासाठीचे अनेक चांगले पर्याय व संशोधनासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत. या क्षेत्रात विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या करिअर संधी खुणावू लागल्या आहेत.

loading image
go to top