esakal | परदेशात शिकताना... : क्रिएटिव्ह डिझाईनच्या विश्‍वात
sakal

बोलून बातमी शोधा

Creative Design

परदेशात शिकताना... : क्रिएटिव्ह डिझाईनच्या विश्‍वात

sakal_logo
By
राजीव बोस

वापरकर्त्याला चांगला अनुभव मिळवून देणे हे तंत्रज्ञानातील विकासाचे मुख्य उद्दिष्ट असते. नव्याने इंटरनेटच्या विश्वात प्रवेश केलेल्यांनाही असा अनुभव देणे हा तंत्रज्ञानाचा उद्देश असतो. हे क्षेत्र सर्व वयोगटांतील आणि क्षेत्रांतील लोकांना आकर्षित करीत असून, या तंत्रज्ञानाचा उपयोग ते दैनंदिन गरजांसाठी करताना दिसतात.

आपले अनुभव बहुतांश आपल्या आठवणींवर आधारित असतात. आपण एखादा विशिष्ट आवाज, रंग, स्वाद यांच्या मदतीने गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला मिळालेला अनुभव आनंददायी आहे अथवा नाही, हे ती आठवण किती तीव्र किंवा टोकाची होती यावर अवलंबून असते. सध्या डिझाईन हा कोणत्याही क्रिएटिव्ह कामाचा आत्मा बनला आहे. या ज्ञानामध्ये एमएस प्रोगॅम इन युजर एक्स्पिरिअन्स किंवा ‘यूआययूएक्स’ हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास अधिक चांगली भर पडते व वापरकर्त्यांना अधिक चांगला अनुभव देणे शक्य होते.

हा अभ्यासक्रम विकसित करणाऱ्यांच्या लक्षात आले, की केवळ तांत्रिक गुणवत्तेच्या जोरावर डिझाईनच्या सौंदर्यविषयक अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे विविध क्षेत्रांतील विद्यार्थी या विशेष अभ्यासक्रमाकडे आकर्षित होत असून, ते त्यांच्यातील उपजत कलागुणांचा वापर करीत आहेत. ते या ज्ञानाला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देत या क्षेत्रात स्वतःसाठी जागा तयार करीत आहेत. या क्षेत्रात कॉम्प्युटर सायन्स, आर्किटेक्चर आणि फाईन आर्ट्ससारख्या क्षेत्रांतील विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.

अमेरिकेत या क्षेत्रातील ग्रॅज्युएट प्रोग्रॅमसाठी ४ वर्षांची अंडरग्रॅज्युएट डिग्री आणि डिझाईनचे सखोल ज्ञान आवश्यक ठरते. या प्रोग्रॅममध्ये केवळ मनुष्य आणि संगणकातील इंटरॅक्शनवर भर न देता वापरकर्त्याच्या अनुभवाला अधिक महत्त्व दिले जाते.

त्यामुळे डिझाईनिंगमधील नैपूण्यांमध्ये वाढ होते. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध कंपन्यामध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीच्या संधी मिळू शकतात.

loading image
go to top