esakal | परदेशात शिकताना... : डेटा ॲनॅलिसिस आणि संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Data Analysis

परदेशात शिकताना... : डेटा ॲनॅलिसिस आणि संधी

sakal_logo
By
राजीव बोस

तंत्रज्ञानाने समाजाच्या सर्वच स्तरांतील प्रत्येकाच्याच आयुष्यात आता प्रवेश केला आहे. आता संपूर्ण जगच एखाद्या ‘स्मार्ट सिटी’मध्ये परावर्तित झाल्याचे आपण पाहात आहोत. आपण सर्वजण एकमेकांशी व्हर्च्युअल माध्यमातून जोडले गेलो आहोत. याचा फायदा सर्वच लहान व मोठ्या उद्योगांना होताना दिसत असून, त्यांना त्यांची उत्पादने वैश्विक व्यासपीठावर विकणे आता सहज शक्य होत आहे. त्यामुळेच इ-कॉमर्समध्ये झालेली वाढ आपण पाहात आहोत. आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे, की आपल्याला केवळ एक बटन दाबून कधीही आणि केव्हाही ऑनलाइन शॉपिंग करता येते. या तंत्रज्ञानाचे एक महत्त्वाचे उपउत्पादन आहे माहिती ऊर्फ डेटा. हा निर्माण झालेला प्रचंड डेटा योग्यप्रकारे वेगळा करणे, त्याचे पृथःकरण करणे व विश्लेषणाद्वारे त्याचे बिझनेस इंटेलिजन्समध्ये रूपांतर करणे, हे खूप मोठे काम आहे.

संशोधनाच्या अनेक संधी

डेटा अॅनालिसिससाठी खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले असून, प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्स, नॅचरल लॅंग्वेज प्रोसेसिंग, सेंटिमेंट अॅनालिसिस आणि अशा अनेक नावांनी त्यात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणले जात आहे. हे डेटा अॅनालिसिस किंवा डेटा सायन्स नावाचे क्षेत्र आता खूपच जोमात असून, त्याद्वारे केवळ मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदाच होत नाही, तर विपुल प्रमाणात संशोधनाची क्षेत्रेही खुली होत आहेत.

आज अनेक मान्यताप्राप्त संस्था या क्षेत्रातील उत्कृष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवीत आहेत. त्यांची नावे मास्टर्स इन इन्फर्मेशन सिस्टिम, मास्टर्स इन डेटा सायन्स, मास्टर्स इन बिझनेस अॅनालिटिक्स किंवा मास्टर्स इन टेक्नोलॉजी मॅनेजमेंट अशी आहेत. या सर्व अभ्यासक्रमांसाठी स्टॅटिस्टिक्स व प्रोग्रॅमिंगमधील नैपुण्य असणे आवश्यक आहे. अमेरिकेतील अनेक विद्यापीठे विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व डेटा अॅनालिसिसच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ऑनलाइन शॉर्टटर्म कोर्सेसचे आयोजन करतात. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मूलभूत व उपयोगी पडणारे ज्ञान मिळते व त्याचा उपयोग त्यांना या क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रम अधिक विस्तृतपणे पूर्ण करताना होतो.

loading image