esakal | परदेशात शिकताना... : मॅथेमॅटिक्समधील ‘विशेष’ संधी! I Abroad Education
sakal

बोलून बातमी शोधा

Abroad Education

परदेशात शिकताना... : मॅथेमॅटिक्समधील ‘विशेष’ संधी!

sakal_logo
By
राजीव बोस

विद्यार्थी अनेकदा मॅथेमॅटिक्स या विषयापासून चार हात दूर राहतात आणि हा विषय अगम्य असल्याचा ग्रह करून घेतात. मात्र, भारतीय शिक्षण व्यवस्थेने गणित या विषयाला कायमच मोठे महत्त्व आणि या वारशाचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. या क्षेत्रात आपल्या देशाने आर्यभट्ट यांच्या काळापासूनच आघाडी घेतलेली आहे. या क्षेत्राकडून अत्यंत उच्च दर्जाच्या हुशारी आणि तार्किक कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी असते. अप्लाईड मॅथेमॅटिक्समधील करिअर म्हणजे केवळ आकडेमोड करणे नव्हे, तर मॅथेमॅटिक्सचा वापर करून प्रत्यक्ष आयुष्यात भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी आणि जगावर त्याचा प्रभाव सोडण्यासाठी केला जातो. व्यावसायिक संस्थांमध्ये मॅथेमॅटिक्स अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते व सध्याच्या डेटावर चालणाऱ्या (डेटा-ड्रिव्हन) बाजारात कंपन्यांना आपला दर्जा कायम राखण्यात मदतही करते.

या क्षेत्रातील व्यावसायिकांना अगदी अभावानेच मॅथेमॅटिशिअन म्हणून संबोधले जाते. याचे कारण ते प्युअर मॅथेमॅटिक्समधील सखोल संशोधनात व्यग्र असतात. या क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना व्यवसाय, उद्योग व सरकारी नोकरीत करिअर करण्याची संधी मिळते. मॅथेमॅटिक्स हे आता अत्यंत विशेष (स्पेशलाइज्ड) क्षेत्र म्हणून पुढे येत असून, आरोग्य, मूलभूत सुविधा, उत्पादन, रोबोटिक्स अशा अनेक महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रांमध्ये पसरत चालले आहे.

मॅथेमॅटिक्समधील पदवी अभ्यासक्रमात कॅलक्युलस, मल्टिव्हेरिएबल कॅलक्युलस, मॅथेमॅटिकल मॉडेलिंग, लिनिअर अल्जिब्रा, प्रॉबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स अशा विषयांचा समावेश होतो. या अभ्यासक्रमासाठी तार्किक कौशल्ये असलेले विद्यार्थी त्याचप्रमाणे गुंतागुंतीचे प्रॉब्लेम तयार करून मुलांना सोडवण्यासाठी देणारे शिक्षकही गरजेचे असतात. या क्षेत्रात पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी घेण्यास उद्योजक तयार असतात आणि इकोनॉमिक्स, बिझनेस आणि इतर क्षेत्रांमध्ये अधिक संधी उपलब्ध असतात.

loading image
go to top