esakal | परदेशात शिकताना... : ‘एसटीइएम’ आणि संधी

बोलून बातमी शोधा

Studying Abroad
परदेशात शिकताना... : ‘एसटीइएम’ आणि संधी
sakal_logo
By
राजीव बोस

परदेशात पदवीच्या शिक्षणासाठी (Studying Abroad) जाणारे बहुतांश विद्यार्थी ‘एसटीइएम’ (STEM) हा अभ्यासक्रम निवडताना दिसतात. ही अभ्यासाची चार क्षेत्रे आहेत आणि ती सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग व मॅथेमॅटिक्स या नावाने ओळखली जातात. ही चार क्षेत्रे सर्वाधिक मागणी असणारी आहेत व त्यामुळेच अमेरिकेने त्यासाठी विशेष व्हिसा देण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये विद्यार्थी दोन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम (Syllabus) पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे अधिक वास्तव्य अमेरिकेत (America) करू शकतात. याचाच अर्थ अमेरिकेत ‘एफ १’ या व्हिसावर (Visa) पाच वर्षे वास्तव्य करण्याची संधी मिळते. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण (Student Education) पूर्ण केल्यानंतर योग्य नोकरी (Job) मिळवण्यासाठी अधिक कालावधी मिळते. त्यानंतर विद्यार्थी अधिक लवचिक अशा काम करण्यासाठीच्या परवानगी व्हिसासाठी, म्हणजेच ‘एच१बी’ व्हिसासाठी अर्ज करून आपले अमेरिकेतील वास्तव्य वाढवू शकतात. (Rajiv Bose Writes about Studying Abroad)

विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रमाचे एक वर्ष पूर्ण केल्यानंतर तो कंपनीमध्ये इंटर्नशीपसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतो व आपल्या अभ्यासक्रमावर आधारित कामाचा अनुभव घेऊ शकतो. हे साधारणपणे ‘स्प्रिंग ब्रेकच्या’ काळात, म्हणजेच मे ते जुलै या दरम्यान घडते. हा करिक्युलर प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा (सीपीटी) एक भाग असतो. यातून विद्यार्थ्याला त्यांनी पूर्ण केलेल्या विशिष्ट पदवी अभ्यासक्रमातील कामचा थेट अनुभव मिळतो. बहुतांश वेळा असा अनुभव घेणे हा पदवी अभ्यासक्रमातील अनिवार्य भाग असतो आणि अंतिम निकालात या अनुभवाचे गुण जोडले जातात. हा अनुभव विद्यार्थी अभ्यासक्रम करताना किंवा तो पूर्ण झाल्यानंतरही घेऊ शकतात.

img

H1B Visa

इंडस्ट्रीमध्ये प्रशिक्षण घेण्याचा दुसरा एक मार्ग विद्यार्थी अवलंबू शकतात. त्याला ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग (ओपीटी) या नावाने ओळखले जाते. ही ‘एफ१’ व्हिसावर अमेरिकेत राहण्यासाठीची तात्पुरती परवानगी असते व ती एका वर्षासाठी असते. ती ‘सीटीइएम’ या क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षांसाठी वाढवली जाऊ शकते.

भारत आणि एच1बी व्हिसा

अमेरिकेत शिक्षणसाठी एच1बी व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. जगभरातील विद्यार्थी यासाठी अर्ज करीत असले, तरी त्यामध्ये भारतातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असते.