
परदेशात शिकताना... : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संशोधन संधी
मानवापुढे आज आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि त्यातल्या त्यात डीप लर्निंग या सर्वाधिक आव्हानात्मक आणि संपूर्ण कस लागणाऱ्या गोष्टी ठरणार आहेत. एर्युडाइट डीप लर्निंगद्वारे विविध आजार आणि रोगनिदानातील गुंतागुंतीच्या प्रश्न सोडविणे व विविध प्रयोगांच्या माध्यमातून समाजामध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याचे काम केले जाते. डीप लर्गिंग तंत्राच्या माध्यमातून सहज केले जाणारे निदान म्हणजे, शरीरातील ट्यूमर शोधून काढणे व त्याचप्रमाणे थ्री डी रेडिओलॉजिकल चित्रांच्या माध्यमातून आरोग्यपूर्ण शरीररचनेचा अंदाज घेणे. अशाप्रकारे तंत्रज्ञान टू डी आकलनाच्या खूप जात असून, कॉम्प्युटर व्हिजनच्या उपयोगातून शरीराच्या आरपार पाहू शकत आहे. गुगलच्या मदतीने टेक्स्ट सर्च देऊन एखादे चित्र शोधण्याचे तंत्रज्ञान लवकरच इतिहासजमा होणार असून, शोधकर्त्यांसाठी हे तंत्र अधिक सुलभ होणार आहे. मोबाईल फोन फेस आयडीवर चालतील, तुमच्या शरीरातील सर्वांत नाजूक वाहिन्यांवरील शस्त्रक्रिया ३ डी इमेजेसद्वारा होईल. इमेज प्रोसेसिंगमुळे सुटणारे या काही छोट्या समस्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगमध्ये वेगवान प्रगतीच्या मदतीने आपण काही वर्षांपूर्वी अशक्य वाटते होते असे थ्री डी प्रतिमा आणि रिअल टाइम व्हिडिओ आज पाहू शकत आहोत.
इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधील मास्टर्स डिग्रीमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून डिझायनिंग सोल्युशनमधील सुविधा उपलब्ध होता. हे सर्वाधिक स्पर्धात्मक आणि वेगाने पुढे जाणारे क्षेत्र असून, त्यामध्ये संशोधनाच्या सर्वाधिक संधी उपलब्ध आहेत. कार्नेगी मेलॉन विद्यापीठातील डीएनएस कॉन्सट्रेशनचा ‘द न्यूरल सिग्नल प्रोसेसिंग कोर्सवर्क किंवा पूर्ड्यू विद्यापीठातील इमेजिंग व्हाइट मॅटर फंक्शनल ऑर्गनायझेशनचा इंटिग्रेटेड ब्रेन इमेजिंग हे अनेक संभाव्य पर्यायांपैकी दोन आहेत. चांगली शैक्षणिक गुणवत्ता, या क्षेत्रातील प्रकल्पांवरील काम आणि इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्च पेपर्स हे या कोर्सेससाठी प्रवेश मिळण्याचे किमान निकष आहेत.