परदेशात शिकताना... : मार्केटिंगचे आव्हानत्मक करिअर

मार्केटिंगच्या तंत्रज्ञानात मोठी क्रांतीकारी ताकद असून, त्यातून व्यवसायाला मानवी चेहरा मिळतो. ग्राहकांना उत्पन्नाशी जोडून घेण्याची ताकद मार्केटिंगमध्ये आहे.
Marketing
MarketingSakal

मार्केटिंगच्या तंत्रज्ञानात मोठी क्रांतीकारी ताकद असून, त्यातून व्यवसायाला मानवी चेहरा मिळतो. ग्राहकांना उत्पन्नाशी जोडून घेण्याची ताकद मार्केटिंगमध्ये आहे. कोणताही ब्रॅण्ड ग्राहकाच्या आयुष्याशी एकरूप होण्यासाठी मार्केटिंगच्या लोकांना ग्राहकांना त्यांच्या धोरणांच्या केंद्रस्थानी ठेऊन विचार करणे अनिवार्य असते. मार्केटिंग व्यवसायाच्या धोरणाशी निवडीत व अत्यंत आवश्‍यक असल्याने मार्केटिंगच्या लोकांना कंपनीचे उत्पादन, ते देणार असलेल्या सेवा, कंपनीचे ग्राहक नक्की कोण आहेत, मार्केटिंगसाठी कंपनीचे बजेट किती आहे, कंपनीचे कोर्पोरेट धोरण काय आहे व त्याचप्रमाणे कंपनीचे छोट्या व मोठ्या कालावधीसाठीची ध्येये काय आहेत, याची माहिती असणे अत्यंत गरजेचे असते.

मार्केटिंगच्या धोरणात सातत्य असणे अत्यंत गरजेचे असते, कारण त्यातून लोकांचे कंपनीबद्दलचे मत तयार होताना त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावली जाते. अशा प्रकारे धोरण आखून काम केल्यास व ग्राहकांशी संवाद साधल्यास कंपनीला आपले नाव लोकांपर्यंत पोचवण्यात यश मिळते व त्यालाच ग्राहक ‘ब्रॅण्ड’ म्हणून ओळखतात. मात्र, ग्राहकांकडे लक्ष देण्याचे हे तंत्र मानवविरहित किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीने केल्यास खोटेपणाचे किंवा वरवरचे वाटू शकते. त्यामुळेच व्यक्तिगत लक्ष व सर्जनशीलतेच्या माध्यमातून, विशिष्ट विचार व अभिव्यक्तीद्वारे केलेले मार्केटिंग अधिक परिणामकारक होते व त्यामुळे या क्षेत्रात उमेदवारी करणाऱ्यांसाठी ते मनोरंजक व तेवढेच आव्हानात्मक करिअर ठरते.

विशिष्ट अभ्यासक्रमांची माहिती

मार्केटिंगमधील एमएसचा भाग असलेले काही विशिष्ट अभ्यासक्रम ः १) केसेस ऑफ फिजिबिलिटी ॲनालिसिस २) व्हेंचर इनिशिएशन ३) ॲन्टिसिपेट ॲण्ड अव्हॉइड स्टार्टअप पिटफॉल्स ५) प्रॉब्लेस सॉल्व्हिंग फॉर अर्ली-स्टेड कंपनीज ६) ॲनालिटिक्स ॲण्ड लॉजिटिक्स. यामध्ये डिझायनिंग स्प्रेडशीट बेस्ड मॉडेल्स, न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, इनव्हेंशन ॲण्ड टेक्नोलॉजी डेव्हलपमेंट आदी अभ्यासक्रमांचा समावेश होतो.

या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांना लिडरशीप, टिमवर्क, ॲनालिटिकल स्किल्स आणि वैयक्तिक नैपूण्यांबद्दलची माहिती उदाहरणांसह सादर करावी लागते. यासाठी कमीत कमी १ ते ३ वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य असते. त्याचबरोबर ‘टोफेल’ या परीक्षेत चांगले गुण व प्रथम श्रेणी आवश्‍यक असतात. या परीक्षेतील प्रत्येक विभागात कमीत कमी २२ गुण मिळालेले असणे गरजेचे असते. या अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी तुम्ही वैयक्तिक मुलाखतीसाठी अधिक चांगली तयारी करून जाणेही अत्यंत आवश्‍यक ठरते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर खासगी कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी अगदी सहजच मिळू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com