चला, स्वत:ला सावरुया... वाचा सविस्तर...

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर
Thursday, 23 July 2020

सध्या दिवसच खूप वेगळ्या प्रकारचे आहेत. ही वेळ अधिक कठीण, अनिश्चित,अभूतपूर्व अशी आहे. तरीही, ताण घेऊन किंवा घाबरून काहीच उपयोग होणार नाही. त्याचा कधीही कुणालाही फायदा होत नाही.

कोरोना लॉकडाउनच्या सध्याच्या अभूतपूर्व संकटात अनेक जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. अशा प्रत्येकाशी ही बातचीत. खरे तर मी तुमच्या वेदना, गोंधळ अनुभवू शकत नाही. कुणीही तो अनुभव घेऊ शकणार नाही. नोकरी नसताना कशा प्रकारचे वाईट विचार डोक्यात येतात, याची मला जाणीव आहे. आपण फक्त एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करू शकतो. त्यासाठी हे लिहित आहे. मात्र, सध्या दिवसच खूप वेगळ्या प्रकारचे आहेत. ही वेळ अधिक कठीण, अनिश्चित, अभूतपूर्व अशी आहे. तरीही, ताण घेऊन किंवा घाबरून काहीच उपयोग होणार नाही. त्याचा कधीही कुणालाही फायदा होत नाही. अशा वेळी फक्त चार गोष्टी मदत करू शकतात. त्या कोणत्या हे आपण पाहूयात.

सतत सकारात्मक व आशावादी राहणे.
ज्या गोष्टी करण्याची गरज आहे, 
त्या करत राहणे.
अनावश्यक गोष्टी 
करणे थांबवणे.
फायदेशीर ठरणाऱ्या 
नवीन गोष्टी शिकणे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणत्याही वादळानंतर काळेकुट्ट ढगही हटण्यास सुरूवात होते. आकाश निरभ्र होते. सध्या जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असला, तरी जग पुन्हा पूर्वीसारखे होईलच. तुम्ही आणि तुमच्या कोरोनापूर्वीच्या जगातील योगदानाचीही या नवीन जगालाही गरज असेल. त्याशिवाय ते चालू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही आताच्या परिस्थितीत शांत, सुरक्षित आणि खंबीर राहायलाच हवे. वर्तमानकाळाचा सामना करायला हवा. तुम्हाला ताण जाणवेल, कोणतेही दडपण वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या श्वासाबद्दल जागरूक व्हा. तो तुम्हाला सांगेल की तुम्ही जिवंत आणि निरोगी आहात. कदाचित थोडा अधिक वेळ वाट पाहावी लागेल. मात्र, आपण या सर्वांतून कणखर होऊन, मजबूत बनून बाहेर पडू. त्यासाठी इतर कोणताच पर्याय नाही. तेव्हा तुम्ही हा पर्याय निवडताय ना? 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramesh Sood article about Improve yourself Be positive and optimistic

Tags
टॉपिकस
Topic Tags: