संभाषणादरम्यान ‘पॉज’ चे महत्त्व... 

रमेश सूद
Thursday, 4 June 2020

आपल्याला योग्य वेळी कोणतीही अनावश्यक धावपळ न करता आणि कसल्याही अडथळ्याशिवाय व्यवस्थित संभाषण करता येईल. म्हणून तुम्ही आज स्वत:लाच अशा प्रकारे ‘पॉज’ घेण्याचे वचन द्या.

एकेदिवशीचा प्रसंग. मला एका मॉलमध्ये जाण्यासाठी रस्ता ओलांडायचा होता. मी क्षणभर थांबलो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला काळजीपूर्वक पाहिले. त्यानंतर, भरधाव वाहनाची धडक बसण्याचा धोका टाळून रस्ता सुरक्षितरीत्या ओलांडणे शक्य आहे, असे लक्षात आल्यावर मी शांतपणे तो ओलांडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ओह...रस्ता ओलांडताना आपण लावतो, तोच नियम संभाषणातही लावला तर? त्यामुळे, कार्यालयातील मीटिंग्ज किंवा तावातावाने केल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही वादविवादामध्ये एखादी व्यक्ती सहजपणे शाब्दिक अपघात टाळू शकेल. 

अनेक लोक तावातावाने वादविवाद करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांचे करिअर संपल्याचे आपण पाहत नाही का? रस्ता सुरक्षितरीत्या ओलांडण्यापूर्वी मी क्षणभर ‘पॉज’ घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहिले, त्याचप्रमाणे, संभाषणादरम्यान काहीवेळ ‘पॉज’ घ्यायला हवा. त्यामुळे, आपल्याला योग्य वेळी कोणतीही अनावश्यक धावपळ न करता आणि कसल्याही अडथळ्याशिवाय व्यवस्थित संभाषण करता येईल. म्हणून तुम्ही आज स्वत:लाच अशा प्रकारे ‘पॉज’ घेण्याचे वचन द्या. अवघड, जटिल संभाषणास सुरवात होण्यापूर्वी तुम्ही काळजीपूर्वक पॉज घ्या. त्यानंतर, तुमचे आयुष्य अधिक चांगले असेल, खरे ना? 

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramesh Sood article importance of pauses during a conversation

Tags
टॉपिकस
Topic Tags: