दररोजच्या अर्थपूर्ण आयुष्यासाठी...

रमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर
Thursday, 19 March 2020

दररोज किमान पाच मिनिटे तरी ध्यान करा. त्यामुळे, तुम्ही तुमचा आत्मा, चैतन्याच्या संपर्कात राहाल. तो आनंदी राहण्यासही ध्यानाची मदत होईल. 

इम्प्रूव्ह युअरसेल्फ
आपण आपल्या घरातील कुंडी किंवा बागेमधील रोपांना नियमितपणे पाणी घालतो. पाण्याअभावी ही रोपे सुकू नयेत, जळू नयेत म्हणून आपण ही काळजी घेतो. मग आपला आत्मा, मन आणि शरीराबद्दल काय? या सर्वांनी मिळून आपले आयुष्य घडते, त्यामुळे आपण त्यांचे पालनपोषण करण्यासही सुरुवात करायला हवी. दररोजचे थोडे थोडे मरण पत्करण्यापेक्षा प्रत्येक दिवस पूर्णपणे रसरसून, जिवंतपणे जगण्याचा पर्याय अधिक चांगला आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तुम्ही आता या क्षणी अतिशय सजग, सचेत आहात. आपण हा लेख वाचतोय, असा विचारही तुम्ही करताय, हे ठीकच आहे. अगदी बरोबरच. आता याच क्षणापासून तुम्ही स्वत:ला स्वयंविकास साधण्याचे वचन द्या. 

दररोज किमान पाच मिनिटे तरी ध्यान करा. त्यामुळे, तुम्ही तुमचा आत्मा, चैतन्याच्या संपर्कात राहाल. तो आनंदी राहण्यासही ध्यानाची मदत होईल. 

दररोज किमान २० मिनिटे काहीतरी चांगले, प्रेरणादायी वाचन करा. आपण सातत्याने शिकत राहून विकसित झालेच पाहिजे. 

चला, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज सकाळी फेरफटका मारूयात. धावण्याचा किंवा जिमला जाण्याचा पर्यायही आपल्याकडे आहे. नियमित व्यायामाच्या जोडीला पौष्टिक आहार घेणेही महत्त्वाचे आहे. आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या, चुकीच्या सवयीही सोडून द्यायला हव्यात. प्रकृतीच्या काळजीबरोबरच आपण आपल्या नात्यांचीही काळजी घ्यायला हवी. 

आपण ज्यांचा आदर करतो, आपल्याला आवडतात, अशा व्यक्तींच्या संपर्कात राहूयात. त्यातून, दीर्घकालीन नाते तयार होईल. तुम्ही असताल त्या ठिकाणी लोकांच्या चांगल्यासाठी आपापल्या परीने योगदान द्यायला हवे. 

थोडक्यात, रोपाला नियमित पाणी घालण्याप्रमाणेच तुम्ही या सर्व गोष्टींची जोपासना करायला हवी. तुम्ही हा तुमच्या दिनक्रमाचा भाग बनवला, तर लवकरच तुमच्या सर्वोच्च क्षमतेनुसार काम करू शकाल. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा...     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramesh Sood trainer Storyteller improve yourself