गोष्ट आत्म्याच्या वयाची 

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर 
Thursday, 20 August 2020

आपण आत्मे आहोत, अगदी शुद्ध आत्मे आणि कर्माचे चक्र पूर्ण करण्याचा प्रवास करत आहोत.’ अचानक बोलता बोलता तो मध्येच थांबला पूर्णपणे गंभीर दिसण्याचा तो सर्वतोपरी प्रयत्न करत होता... 

एके दिवशीची गोष्ट. माझ्यासमोर बसलेली एक व्यक्ती मला पुराणातील कथा सांगून घाबरवण्याचा प्रयत्न करत होती. अशा विषयावर मी कधीही आत्मविश्वासाने चर्चा करू शकत नाही. माझी हीच कमजोरी त्याने बरोबर ओळखली होती. त्यामुळे मी सावध होतो. त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होतो. कॉफीचा एक घोट घेत तो बोलत होता. 

तो पुढे म्हणाला, ‘आपण आत्मे आहोत, अगदी शुद्ध आत्मे आणि कर्माचे चक्र पूर्ण करण्याचा प्रवास करत आहोत.’ अचानक बोलता बोलता तो मध्येच थांबला पूर्णपणे गंभीर दिसण्याचा तो सर्वतोपरी प्रयत्न करत होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

त्याने काही मिनिटे माझ्याकडे रोखून पाहिले. त्यानंतर विचारले, ‘तुझे वय किती आहे?’ 

‘का?’ मी आश्चर्यचकित होऊन त्याला प्रतिप्रश्न केला.‘मला सांग तरी. मला ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे,’ तो म्हणाला. 

मी म्हणालो, ‘आपण आत्मे आहोत असे तू म्हणालास.’ 

‘होय’ त्याने उत्तर दिले. 

मी पुन्हा त्याला विचारले, ‘आत्म्याला तर कुठलेच वय नसते. मग तू हे का विचारतोस?’ 

यावर त्याने माझ्याकडे त्रासिकपणे कटाक्ष टाकला. आता तो वैतागला होता. उभा राहत मला म्हणाला, ‘तुझ्याशी बोलण्यात काहीही उपयोग नाही. तू कोडगा आहेस. कधीही सुधारणार नाहीस.’ एवढे बोलून तो निघून गेला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आता तुम्ही मला सांगा की यात माझा काय दोष? 

नेहमीच आपण काय बोलतो आहोत, याचे भान न ठेवता का बोलत असतो? जाऊ द्या हा विषय सोडून द्या. आता तुम्हीच मला एक गोष्ट सांगा, आत्म्याचे वय किती असते?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh sud article about age of the soul

Tags
टॉपिकस
Topic Tags: