इम्प्रूव्ह युअरसेल्फ : सराव बुद्धिमत्ता ओळखण्याचा..

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर
Thursday, 15 October 2020

तुम्हाला तुमची प्रतिभा, बुद्धिमत्ता दाखविण्यासाठी सातत्याने सराव करण्यावर लक्ष केंद्रित करण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो. ती विकसित करण्यासाठी काही न केल्यामुळे आयुष्याचा हेतू समजण्याची संधीच तुम्ही गमावून बसता.

तुम्ही तुमच्या मित्रासोबत बसलेले आहात आणि तुमच्या आवडीची अशी गोष्ट करत आहात, जी तुम्ही प्रयत्नपूर्वक वेळ देऊन शिकलेली आहे. ती गोष्ट कौशल्यपूर्वक करण्यासाठीची बुद्धिमत्ताही तुमच्याकडे होती. अशावेळी एखादा कोणीतरी त्याविषयी म्हणतो की, त्यात काय एवढे? ही गोष्ट करणे अवघड नाही. मीसुद्धा ती करू शकतो. त्याच वेळी तुम्ही त्या व्यक्तीला ती गोष्ट करण्यासाठी सांगण्याची गरज असते. अर्थात, तो ती करू शकणार नाही, हे तर उघडच. त्या व्यक्तीने तिचा सराव केलेला नसतो. या उलट तुम्ही ती शिकलेली असता. तिचा सरावही केलेला असतो. मी गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने करू शकता, हे स्वीकारण्यात त्या व्यक्तीचा अहंकार आडवा येत असतो. तुम्हाला तुमची प्रतिभा, बुद्धिमत्ता दाखविण्यासाठी सातत्याने सराव करण्यावर लक्ष केंद्रित करण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो. केवळ बुद्धिमत्ता असूनही चालत नाही. ती विकसित करण्यासाठी काही न केल्यामुळे आयुष्याचा हेतू समजण्याची संधीच तुम्ही गमावून बसता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुम्ही त्यासाठी खालील 
तीन कृती आवर्जून करा.
१. तुमची बुद्धिमत्ता ओळखा.
२. ती विकसित करण्यात तुम्हाला कोणाची मदत होऊ शकते, हेही लक्षात घ्या.
३. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव करा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मला तरी स्वतःची प्रतिभा, बुद्धिमत्ता विकसित न करण्याची खंत नाही. आपल्यात कविता करण्याची प्रतिभा असल्याचे मी आयुष्याच्या सुरुवातीलाच ओळखले होते. या काव्यविषयक प्रतिभेतून मी कविता करत असे. खरेतर, कविता करण्यातून माझी मानवी वर्तन खोलवर समजून घेण्याची क्षमताच अधोरेखित झाली. त्यातूनच मी आयुष्यात अनेक मैलाचे दगड गाठू शकलो. तुम्ही तुमची बुद्धिमत्ता विकसित  करताय ना?

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh sud article about intelligence

Tags
टॉपिकस
Topic Tags: