इम्प्रूव्ह युअरसेल्फ : पैशाचा ‘अर्थ’ समजून घेताना... 

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर 
Thursday, 17 December 2020

तरीही आपण आयुष्यात अशा गोष्टींवर खर्च करत राहतो, ज्यांचा ना धड आपल्या आयुष्याला काही फायदा होतो ना इतरांच्या. पैसे कमावणे खूप अवघड असते. त्यामुळेच आपण पैशाची कदर ठेवायलाच हवी. तुम्हाला काय वाटते? 

मला अजूनही तो प्रसंग आठवतो. ही १९७८ मधील घटना. मी तेव्हा फक्त १८ वर्षांचा होतो. अजूनही एका व्यापारी कुटुंबाचा भाग होतो. आजही मला इतक्या वर्षांपूर्वीचा प्रसंग स्पष्टपणे आठवतो. माझ्या एका मित्राच्या काकांमधील भेटीवेळी मीही त्या ठिकाणी हजर होतो. थोड्या वेळात झालेल्या या चर्चेवेळी काकांनी व्यवसायाच्या कोणत्यातरी व्यवहारात दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याची खंत मित्राकडे व्यक्त केली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यावर माझा हा मित्र सहजपणे म्हणाला, ‘‘फक्त १० हजारांच्या नुकसानीचा तुम्हाला त्रास होतोय. हे काय आहे?’’ 

त्याच्या काकांनी त्याच्याकडे प्रखरपणे कटाक्ष टाकला. त्यांचे शब्द आजही मला चांगले आठवतात. ते त्याला म्हणाले, ‘‘तू ज्या दिवशी स्वतः १० हजार रुपये कमावशील, त्या दिवशी आपण या विषयावर चर्चा करू.’’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माझ्या मित्राबाबत पुढे काय घडले, हे मला माहीत नाही, पण माझ्या आयुष्याने एकदम वेगळे वळण घेतले. मी १९८२मध्ये माझे घर सोडल्यावर महिना ५०० रुपये वेतनाच्या नोकरीला सुरवात केली. त्यानंतर, साधारण १९८६च्या आसपास माझ्या बॅंक खात्यात दहा हजार रुपये जमा झाले होते. ते मी माझ्या स्वत:च्या वेतनातून साठवले होते. मला दहा हजारांची बचत करण्यासाठी चार वर्षे लागली. मला माझ्या या मित्राचे काका आठवतात. ओह...एक रुपया मिळविणेही किती अवघड असते ना? 

तरीही आपण आयुष्यात अशा गोष्टींवर खर्च करत राहतो, ज्यांचा ना धड आपल्या आयुष्याला काही फायदा होतो ना इतरांच्या. पैसे कमावणे खूप अवघड असते. त्यामुळेच आपण पैशाची कदर ठेवायलाच हवी. तुम्हाला काय वाटते? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh sud write article money

Tags
टॉपिकस
Topic Tags: