'मार्ग' नियमपालनाचा

रमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर
Thursday, 27 February 2020

 वाहतुकीचे नियम मोडून मी किती वेळ वाचवतो?
 या वेळेचे मी नेमके काय करतो?
 हे जोखीम घेण्यासारखे आहे काय?
हे प्रश्न आपल्याला वाहतूक सुरक्षितता वाढविण्यास मदत करतात.  

इम्प्रूव्ह युअरसेल्फ

मी   एकेदिवशी नेहमीप्रमाणे रस्त्यावरून माझ्या गाडीतून जात होतो. मला अचानक ब्रेक मारावा लागला. एका तरुण मोटारसायकलस्वाराने नुकताच सिग्नल मोडला होता. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. या तरुणाने नेमक्या कोणत्या प्रकारच्या विचारातून किंवा आणीबाणीतून हे वर्तन केले असेल, असा विचार माझ्या मनात आला. त्याने नियम मोडून फारतर एक किंवा दोन मिनिटे वाचवली असतील. त्यापाठोपाठ आणखी एक विचार आला. त्याने या वाचलेल्या एकदोन मिनिटांचे काय केले असेल? फक्त त्याच्याकडेच याचे उत्तर होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मी तुम्हाला हे सांगतोय कारण आपण वेळ वाचवण्याच्या नादात रस्त्यावर शॉर्टकट घेतो आणि धोक्याला आमंत्रण देतो. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, इतर वाहनांना धोकादायकरीत्या कट मारणे, आपण नवीन कार किंवा बाईक घेतलीय, हे अनोळखी व्यक्तींना दाखविण्यासाठी ती वेगाने चालविणे आदी गोष्टी सुप्त जाणीवेतून केल्या जाऊ शकतात. त्यापैकी कोणत्या चुकीच्या गोष्टीमुळे दुसऱ्याचे जीवन धोक्यात येऊ शकते, याची नियम मोडणाऱ्यालाही जाणीव नसू शकते. त्यामुळे, आपण स्वत:ला काही प्रश्न विचारलेच पाहिजे.  
 
 वाहतुकीचे नियम मोडून मी किती वेळ वाचवतो?
 या वेळेचे मी नेमके काय करतो?
 हे जोखीम घेण्यासारखे आहे काय?
हे प्रश्न आपल्याला वाहतूक सुरक्षितता वाढविण्यास मदत करतात.  

मला आणखी तो दिवस आठवतो. त्या दिवशी मी कॅब चालकाला मुख्य रस्त्याने गाडी घ्यायला लावली. तोही शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करत होता. माझ्याकडे वेळ होता आणि शॉर्टकटमधून वाचणारे पाच मिनिटे माझ्या नेमके कसे उपयोगी पडणार होते, हे मला माहीत नव्हते. कोणती आपत्कालीन वेळही नव्हती. खरेतर आणीबाणीच्या प्रसंगीही आणखी आणीबाणी निर्माण न करता नेहमीच्याच वेगाने वाहन चालविल्यावरही आपण सारख्याच वेळेत पोचू शकतो. यासाठी एका भक्कम वचनबद्धतेची आणि सरावाची गरज असते. मात्र, हा सराव करणाऱ्या व्यक्ती अधिक आनंदी आयुष्याकडे प्रवास करतात. खूप वर्षांपूर्वी महामार्गावर प्रवास करताना ट्रकच्या मागे लिहिलेली ओळ मी कधीच विसरू शकत नाही. ती अशी होती -
जिन्हे जल्दी थी वो चले गये..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramesh sudh article Follow the rules