esakal | सुवर्णसंधी! Indian Navy मध्ये तब्बल 2500 पदांसाठी मोठी भरती; 'असा' भरा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Navy

सुवर्णसंधी! Indian Navy मध्ये तब्बल 2500 पदांसाठी मोठी भरती; 'असा' भरा अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : Indian Navy AA/SSR 2021 : भारतीय नौदलातील सेलर्स प्रवेशांतर्गत आर्टिफिशर अप्रेंटिस (एए -150) आणि वरिष्ठ माध्यमिक भरतीसाठी (एसएसआर -02 / 2021) अर्ज प्रक्रिया 26 एप्रिलपासून सुरू झाली आहे. भारतीय नौदल एए / एसएसआर 2021 भरतीसाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया 30 एप्रिलपर्यंत उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे भारतीय नौदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नेव्ही भरती पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट देऊन (joinindiannavy.gov.in) एए -150 आणि एसएसआर -02 / 2021 चा ऑनलाइन अर्ज भरू शकता. भारतीय नौदलाने गेल्या आठवड्यात पोर्टलवर सेलर एन्ट्री एए -150 आणि एसएसआर -02 / 2021 बॅच अंतर्गत 2500 पदांसाठी एक सूचना प्रसिध्द केली होती.

कोण अर्ज करू शकेल?

भारतीय नेव्ही सेलर्स आणि वरिष्ठ माध्यमिक भरतीकरिता (एसएसआर) उमेदवारांनी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र व संगणक विज्ञान विषयांसह 10 +2 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तथापि, आर्टिफिशर अप्रेंटिस प्रवेशासाठी उमेदवारांने या परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळविला पाहिजे. यासह दोन्ही पदांच्या उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या तारखेस 17 वर्षांपेक्षा कमी आणि 20 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

Banking क्षेत्रात करिअर करायचं आहे?, मग 'अशी' करा जोरदार तयारी

अशी होईल निवड

भारतीय नौदल एए / एसएसआर भरती 2021 च्या अधिसूचनेनुसार, कोविड साथीच्या आजारामुळे सुमारे 10 हजार उमेदवारांना लेखी परीक्षा आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीएफटी) साठी आमंत्रित केले जाईल. त्याचबरोबर लेखी परीक्षा आणि पीएफटीसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग 10 +2 मध्ये पात्रता परीक्षेच्या आधारे केली जाईल. राज्यनिहाय रिक्त पदांच्या संख्येनुसार नौदलाकडून लेखी परीक्षेचा कट ऑफ जाहीर केला जाईल.

loading image