esakal | NHAI Recruitment : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 41 पदांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज

बोलून बातमी शोधा

NHAI Recruitment
NHAI Recruitment : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 41 पदांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : NHAI Deputy Manager Recruitment 2021 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (National Highways Authority of India, NHAI) उपव्यवस्थापक, तंत्रज्ञच्या (Deputy Manager, Technical) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी NHAI च्या अधिकृत साइटवर nhai.gov.in आपला अर्ज सादर करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 41 पदांची नेमणूक करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 28 मे 2021 आहे. यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

व्यवस्थापक पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली पाहिजे. याशिवाय सिव्हिल फायनलचे उमेदवार आणि सिव्हिल इंजिनिअरिंगची सेमिस्टर पदवी घेणारे उमेदवार देखील अर्ज करु शकतात. त्याचबरोबर उमेदवारांची वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा जास्त नसावी.

केंद्रीय विद्यालयाकडून प्रवेशासंदर्भात मोठा निर्णय; आता 'असे' होणार Admission

अशी होईल निवड

उमेदवारांची निवड ही गेट स्कोअरच्या आधारे केली जाईल. त्याचबरोबर, शैक्षणिक पात्रतेसह निवड प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात.