NWDA Recruitment : राष्ट्रीय जल विकास प्राधिकरणात 62 पदांसाठी भरती, 'असा' भरा अर्ज

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयात सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे.
NWDA Recruitment
NWDA Recruitmentesakal

NWDA Recruitment 2021 : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयात सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागांतर्गत राष्ट्रीय जल विकास एजन्सीने (NWDA) 62 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. एजन्सीने काल 10 मे रोजी जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार, (क्र.07/2021) लोअर डिव्हिजन लिपिक, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर, कनिष्ठ अभियंता आणि हिंदी ट्रांन्सलेटर इत्यादी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. (Recruitment For 62 Posts In National Water Development Agency)

अर्ज कसा करावा?

अर्ज करू इच्छिणारे उमेदवार एनडब्ल्यूडीएच्या अधिकृत संकेतस्थळावर (nwda.gov.in) उपलब्ध असलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. ही ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 10 मे'पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 25 जून 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करु शकतात. अर्ज भरतेवेळी जनरल आणि ओबीसी उमेदवारांना 840 रुपये आणि एससी, एसटी, आर्थिक दुर्बल, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. शिवाय ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज फी भरली जाऊ शकते.

पदनिहाय रिक्त जागांची संख्या व पात्रता

  • लोअर डिव्हिजन लिपिक (23 पद) - 12 वी उत्तीर्ण आणि इंग्रजी 35 शब्द किंवा हिंदीमध्ये प्रति मिनिट 30 शब्द टाइपिंग स्पीड आवश्यक आहे. या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे असणार आहे.

  • अप्पर डिव्हिजन लिपिक (12 पद) - बॅचलर डिग्री आवश्यक, शिवाय वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे गरजेची.

  • स्टेनोग्राफर (5 पद) - 12 वी उत्तीर्ण व शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 80 शब्दांचा वेग आवश्यक आहे. (वय 18 ते 27 वर्षे)

  • कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) (16 पद) - सिव्हिल अभियांत्रिकी पदविका गरजेची. (वय 18 ते 27 वर्षे)

  • कनिष्ठ लेखा अधिकारी (5 पद) - बी.कॉम व 3 वर्षाचा अनुभव आवश्यक. (वय 21 ते 30 वर्षे)

  • हिंदी ट्रांन्सलेटर (1 पद) - हिंदी विषयात एमए आणि इंग्रजीमध्ये बीए आवश्यक, शिवाय ट्रांसलेशनमध्ये डिप्लोमाही गरजेचा. (वय 21 ते 30 वर्षे)

Recruitment For 62 Posts In National Water Development Agency

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com