esakal | SBI Recruitment 2021 : संपूर्ण देशभरात SBI ची बंपर भरती; नोकरीसाठी 'असा' करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

SBI Bank

SBI Recruitment 2021 : संपूर्ण देशभरात SBI ची बंपर भरती; नोकरीसाठी 'असा' करा अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : SBI Recruitment 2021 : स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) फार्मासिस्ट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी इच्छुकांनी एसबीआयच्या sbi.co.in/careers अधिकृत वेबसाइटवर जावून अर्ज सादर करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे 2021 असून सुमारे 15 राज्यांतील बॅंकांत नोकर्‍या उपलब्ध असणार आहेत.

भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून (एसबीआय) फार्मासिस्टची एकूण 67 रिक्त पदे भरली जाणार आहेत. भरतीसंबंधित संपूर्ण माहितीसाठी कृपया अधिसूचना आधी पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या तारखा लक्षात ठेवा

  • ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ : 13 एप्रिल 2021

  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 3 मे 2021

  • भरतीसाठी लेखी परीक्षा : 23 मे 2021

कोण अर्ज करू शकेल?

उमेदवारांकडे एसएससी (SSC), मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्डमधून फार्मसी (D Pharma) डिप्लोमा असणे आवश्यक आहे. अथवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून फार्मसी (BPharma / MPharma / Pharma D) व फार्मसीमधील समकक्ष पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

महिलांना खुशखबर! 'एनटीपीसी'मध्ये काम करण्याची संधी; मिळणार तब्बल 40000 पगार

एसबीआय भरतीची निवड प्रक्रिया

एसबीआय लिपिक कॅडर अंतर्गत फार्मासिस्ट पदांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

अर्ज फी

सर्वसाधारण, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये, तर अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

एसबीआय वेबसाइटवर https://www.sbi.co.in/ Careers उपलब्ध असलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन नोंदणी करावी लागेल आणि अर्ज फी इंटरनेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डद्वारे भरावी लागेल.